• Download App
    YSRTP : दक्षिणेत काँग्रेसने एक प्रादेशिक पक्ष हरवला, दुसरा विलीन केला; तरीही प्रादेशिकांकडून सहकार्याचीच काँग्रेसची अपेक्षा!!|Congress defeated one regional party BRS and merged another party YSRTP

    YSRTP : दक्षिणेत काँग्रेसने एक प्रादेशिक पक्ष हरवला, दुसरा विलीन केला; तरीही प्रादेशिकांकडून सहकार्याचीच काँग्रेसची अपेक्षा!!

    INDI आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून सर्वकाही आलबेल नाही. एकीकडे काँग्रेस आघाडीतले जागावाटप यशस्वी करण्यासाठी दोन पावले मागे येत असल्याच्या तयारीच्या बातम्या येत असला तरी प्रत्यक्षात काँग्रेसच्या “राजकीय क्रीडा” मात्र काही वेगळेच सूचित करत आहेत. Congress defeated one regional party BRS and merged another party YSRTP

    करण दक्षिणेत एकीकडे काँग्रेसने एका प्रादेशिक पक्षाला हरविले आणि दुसरा प्रादेशिक पक्ष आपल्यात विलीन करून घेतला, वर प्रादेशिक पक्षांकडूनच काँग्रेसचे नेते सहकार्याची अपेक्षा वाढवून ठेवत आहेत.



    काँग्रेसने तेलंगण मध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचा पराभव करून सत्ता मिळवली, पण काँग्रेस तिथे फक्त सत्ता मिळवून थांबली नाही, तर आज त्यांनी तेलंगणातलाच एक दुसरा प्रादेशिक पक्ष YSRTP अर्थात वायएसआर तेलंगणा पार्टी काँग्रेसमध्येच विलीन करून घेतली. अखंड आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या वाय. एस. शर्मिला यांनी आपला YSRTP हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्या आता तेलंगण आणि आंध्रमध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्या म्हणून वावरणार आहेत. दिल्लीतल्या काँग्रेसच्या मुख्यालयात त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.

    आंध्र आणि तेलंगणात या विलीनीकरणाचे पडसाद उमटणार आहेत कारण काँग्रेसने वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे घर फोडले आहे. वायएसआर यांचे पुत्र वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे वायएसआर काँग्रेसचे नेते म्हणून आंध्रमध्ये मुख्यमंत्री आहेत, तर त्यांची बहीण वाय. एस. शर्मिला मात्र त्यांच्यापासून अलग होत आता मुख्य काँग्रेस मधून राजकारण करणार आहे.

    पण त्या पलीकडे जाऊन काँग्रेसच्या या “राजकीय क्रीडाच” काही वेगळे सूचित करून जात आहे. एकीकडे काँग्रेसला उत्तर आणि दक्षिण भारतातही समाजवादी पार्टी, तृणमूळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्यासारख्या प्रादेशिक पक्षांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि त्याच वेळी भारत राष्ट्र समिती आणि YSRTP या दोन प्रादेशिक पक्षांचे राजकीय अस्तित्व काँग्रेसने संपवून टाकले आहे. यामुळे काँग्रेसचा नेमका इरादा काय??, याविषयी प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या मनात दाट संशय तयार झाला आहे. 

    संपूर्ण देशातला काँग्रेसचा राजकीय पाया ठिसूळ होत चालला आहे. काँग्रेसची भाजपची टक्कर घेण्याची स्वबळाची शक्ती आता लोकसभेच्या 300 मतदार संघांपेक्षाही खाली आली आहे. काँग्रेस स्वबळावर फक्त 291 जागा लढवू शकते, असे पक्षांतर्गत गोटातच मानले जात आहे. याचा अर्थ एकेकाळी लोकसभेच्या 419 जागा जिंकणारा पक्ष प्रत्यक्ष जागा लढवायच्या बाबतीत फक्त 291 जागांच्या स्वबळापुरता मर्यादित उरला आहे. अशावेळी प्रादेशिक पक्षांचे मनापासून सहकार्य घेत आपला प्रभाव टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना पराभूत करून ते पक्ष आपल्यातच विलीन करून घेण्याचा सपाटा लावल्याचे किमान दक्षिणेत तरी दिसत आहे.

    पण यामुळे उत्तर आणि दक्षिण भारतातल्या ही प्रादेशिक पक्षांमध्ये राजकीय चलबिचल निर्माण झाली आहे.

    उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तामिळनाडू, पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष बळकट आहेत. तिथे काँग्रेसला चंचू प्रवेश करून देऊन आपल्यावरच कम्बख्ती ओढवून घेण्याची या पक्षांची बिलकुल तयारी नाही. अशावेळी या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या मनात काँग्रेस विषयी विश्वास निर्माण करण्याऐवजी तेलंगण सारख्या राज्यात दोन प्रादेशिक पक्षांना नामोहरम करत काँग्रेसने देशात सर्वत्र स्वतःसाठीच मोठी कम्बख्ती ओढवून घेतली आहे!!

    Congress defeated one regional party BRS and merged another party YSRTP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी