• Download App
    सावरकर पुण्यतिथीचा मुख्यमंत्र्यांना विसर; आदित्यचे एक ओळीचे ट्विट; राऊतांनी करून दिली "भारतरत्न"ची आठवण!! CM forgets Savarkar's death anniversary

    #VeerSavarkar : सावरकर पुण्यतिथीचा मुख्यमंत्र्यांना विसर; आदित्यचे एक ओळीचे ट्विट; राऊतांनी करून दिली “भारतरत्न”ची आठवण!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एरवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या हिंदुत्वाचा जोरदार गजर करणाऱ्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना आज मात्र सावरकर पुण्यतिथीचा विसर पडलेला दिसतो आहे. CM forgets Savarkar’s death anniversary

    उपराष्ट्रपती, पंतप्रधान गृहमंत्री यांच्यापासून अनेकांनी सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहणारी ट्विट केलेली असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवर मात्र शुकशुकाट आहे. सावरकर पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानच अस्तित्वात आले नसते, असे भाषण मुख्यमंत्र्यांनी केले होते. पण आज मात्र त्यांनाच सावरकर पुण्यतिथीचा विसर पडल्याचे दिसत आहे. सकाळी 11.30 वाजेपर्यंत त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सावरकर पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहणारे ट्विट केलेले नव्हते.

    महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी “स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन”, एवढे एका ओळीचे ट्विट केले आहे, तर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सावरकर पुण्यतिथी निमित्त सावरकरांना अभिवादन करताना त्यांना अद्याप “भारतरत्न” मिळाले नसल्याची आठवण केंद्र सरकारला करून दिली आहे. भारतरत्न!! अभिवादन!! एवढेच त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. परंतु सावरकरांच्या धाडसे जीवनाचा आढावा घेणारे ट्विट देखील त्यांनी केले आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भारताचे माजी गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारी ट्विट केली आहेत. परंतु या तीन नेत्यांनीदेखील सावरकरांना आदरांजली वाहणारी ट्विट केलेली दिसत नाहीत.

    CM forgets Savarkar’s death anniversary

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा

    ओडिशात बीजेडीला मोठा धक्का, अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल!

    गुजरात किनारपट्टीवर ATS ने 14 पाकिस्तानी पकडले, 602 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त!