प्रतिनिधी
नागपूर : नागपुरात भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना काँग्रेसने अखेर “कात्रजचा घाट” दाखविला आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊन अखेरच्या दिवशी ते ताकदीने निवडणूक लढवत नसल्याचे कारण दाखवून काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Chotu bhoyar’s ticket cut by congress in MLC elections
भाजपच्या आजी-माजी नेत्यांमध्येच नागपुरातून विधानपरिषदेचा सामना; बाकी निवडणूक बिनविरोध
या विधान परिषद निवडणुकीत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात छोटू भोयर यांना निवडणूक लढवायची होती. परंतु, भाजपने तिकीट नाकारले म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने सुरुवातीला त्यांना उमेदवारी जाहीर केली. पण उद्या 10 डिसेंबरला मतदान होण्यापूर्वी ऐन वेळेला त्यांचा पत्ता कट करून अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्राचे मंत्री सुनील केदार यांनी मंगेश देशमुख हेच काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी होतील असा दावा केला आहे.
या राजकीय खेळ प्रकारात छोटू भोयर यांची मात्र खूप पंचाईत झाली आहे. छोटू भोयर हे पंचवीस वर्षे भाजपचे नगरसेवक आहेत. तीस पस्तीस वर्षांपासून भाजपचे कार्य करत होते परंतु परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना उमेदवारी देण्यात आली पण ऐन वेळी ते ताकदीने निवडणूक लढवत नसल्याचे कारण दाखवून काँग्रेसच्या नेत्यांनी पत्ता कट करून या नागपुरी नेत्याला पुण्याचा “कात्रजचा घाट” दाखवला आहे.
Chotu bhoyar’s ticket cut by congress in MLC elections
महत्त्वाच्या बातम्या
- CDS Rawat Death : पहिले सीडीएस रावत यांच्या निधनाने देश शोकसागरात, जगभरातून उमटल्या प्रतिक्रिया, वाचा.. कोणकोणत्या देशांनी व्यक्त केला शोक!
- सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे” ग्रंथाचे उद्या डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन
- Rajnath Singh in Parliament : सीडएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यावर काय झाले? घटनेची चौकशी कोण करणार? राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली माहिती