• Download App
    महापौर पेडणेकरांविषयीचं वादग्रस्त वक्तव्य; आशिष शेलार त्यांच्यावर गुन्हा दाखलControversial statement regarding Mayor Pednekar; crime against Ashish Shelar

    महापौर पेडणेकरांविषयीचं वादग्रस्त वक्तव्य; आशिष शेलार त्यांच्यावर गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे . Controversial statement regarding Mayor Pednekar; crime against Ashish Shelar

    वरळी येथे नुकताच सिलिंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटात चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आणि पाठोपाठ त्याच्या वडिलांनाही प्राण गमवावे लागले. मुंबईच्या महापौर मात्र ७२ तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोचल्या. याच मुद्द्यावरुन शेलार यांनी महापौरांना लक्ष्य केले होते. नायर रुग्णालयात गेलेल्या जखमींना तब्बल ४५ मिनिटे उपचारांविना तसेच ठेवले गेले. त्यांच्यावर औषधोपचार नाही किंवा विचारपूसही केली नाही. या बेफिकिरीमुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला, असे नमूद करत शेलार यांनी वरळीतल्या घटनेवेळी महापौर निजल्या, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. शेलारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.


    ठाकरे – पवार सरकारचा एकच अजेंडा; पब, पार्टी आणि पेग; भाजप आमदार आशिष शेलार यांचे टीकास्त्र


    फडणवीस यांच्याकडून पाठराखण

    विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेलारांची पाठराखण केली. आशिष शेलार महिलांचा अवमान करूच शकत नाहीत. महापौरांविषयी तर अजिबातच नाही. त्यांच्या प्रेसनोटचा, वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. महापौरांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, असं ते म्हणालेत. ते शिवसेनेच्या विरोधात सातत्यानं बोलतात, म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

    ‘वक्तव्य अवमानकारक’
    भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबाबत केलेलं वक्तव्य अवमानकारक असल्याची प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. मुंबईच्या मरीन लाइन्स ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईच्या पोलिस आयुक्तांना या संदर्भातला सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. त्यानुसार गरज भासल्यास आरोपीला अटक करावी, असे निर्देश दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

    भाजपाचं समर्थन

    वरळीतल्या घटनेवेळी महापौर निजल्या, असं वक्तव्य शेलार यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र अशा छोट्या-मोठ्या घटनेवरून घाबरणारे नाहीत. जाणिवपूर्वक दबाव टाकून सत्तेचा दुरुपयोग करून अशाप्रकारे गुन्हा दाखल केला जातोय असे भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. तर प्रवीण दरेकर यांनीही टीका करताना महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. संजय राऊत यांच्यासारखे लोक आक्षेपार्ह बोलतात, त्यावेळी काय भूमिका आहे, असा सवाल त्यांनी केला.
    माझ्या बोलण्याचा विपर्यास केला, महिलांचा अवमान करणे स्वभाव नाही, आता कोर्टातच बाजू मांडेन, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

    Controversial statement regarding Mayor Pednekar; crime against Ashish Shelar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!