• Download App
    सिनिअ‍ॅरिटी कोणती,शिवसेनेची की मंत्रीपदाची, स्वार्थी भुजबळांना पुन्हा आली शिवसेनेची आठवण | The Focus India

    सिनिअ‍ॅरिटी कोणती,शिवसेनेची की मंत्रीपदाची, स्वार्थी भुजबळांना पुन्हा आली शिवसेनेची आठवण

    विशेष प्रतिनिधी

    येवला :  स्वार्थी छगन भुजबळ आपला स्वार्थ साधण्यात पटाईत आहे. अगदी काळानुरूप जुळवून घेणारे भुजबळ हे आपल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांच्या पावलांपाऊल ठेवून वागण्यात मागे राहतच नाही. भुजबळ शिवसेनेत होते, मुंबईचे महापौर,आमदारसह इतर पदे भुषविणारे भुजबळ शिवसेनेमुळेच मोठे झाले हे ते सुध्दा टाळत नाही पण अनेकदा त्यांनी शिवसेनेला शिव्याही दिल्या आहेत. येवल्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांना आपली शिवसेनेतील सिनिअँरिटी आठवली. शिवसेनासोबत सत्तेत असल्याने आपुलकीचे बोलणे साहजिकच आहे,पण त्यातही प्रेमाचा ओलावा असेल तर…याचे उत्तर शनिवारी मिळाले.chhagan bhujbal remembers seniority in shiv sena

    असे म्हणतात की पहिले प्रेम माणूस कधी विसरू शकत नाही…तसेच राजकीय नेता आपला पहिला पक्ष विसरू शकत नाही. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे तर इतरांना टोमणे देत आपल्याला हव्या असलेले पक्ष,नेत्यांचे गोडवे गाण्यात माहिर राहिले आहे. याचि प्रचिती मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या भुजबळांच्या बोलण्यातून जाणवली. अंगणवाडी औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात अध्यक्ष भोलानाथ लोणारी व संचालक मंडळाने पाच ते सहा मागण्यांचा फलक व्यासपीठाच्या समोर लावला. त्यानंतर आमदार किशोर दराडे यांनी मनोगतातून उद्योगमंत्री सुभाष देसाई शिवसेनेचे असल्याने आम्ही पाठपुरावा करू पण साहेब,तुम्ही यासाठी पुढाकार घ्या व मंत्रालयात आपल्या उपस्थितीत उद्योगमंत्र्यासमवेत संचालक मंडळाची बैठक घेत प्रश्न निकाली काढावेत,अशी अपेक्षाही दराडे यांनी व्यक्त केली.



    यावर बोलतांना भुजबळांनी मंत्री तुमच्या पक्षाचे असल्यावर माझ्याकडे कामे ढकलता का,अशी मिश्कील गुगली टाकली. त्यावर मास्टरमाईंड दराडे यांनी साहेब तुम्ही सिनिअर आहात,हा धागा पकडून भुजबळांनी पुन्हा कोणती सिनिअँरिटी शिवसेनेतली की मंत्रीपदाची,असा मार्मिक सवाल केला. भुजबळांचे हे कोड्यातले बोलणे गंमतीचा भाग असला तरी शिवसेनाप्रति असलेला त्यांच्या मनातील भाव पुन्हा व्यक्त झाला. यावेळी जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष वेधत कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी करून थकलो आहोत. तुमच्या खासदारांना याबाबत लक्ष घालायला सांगा, अशा सूचना करून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कसे दुर्लक्ष करते हे अधोरेखित केले.

    chhagan bhujbal remembers seniority in shiv sena

    लासलगावलाही शिवसेनेचे उदाहरण

    येथे भुजबळांना यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याच्या संदर्भात पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी पवारसाहेब वडिलकीच्या नात्याने बोलले. जो इतिहास सांगितला जातो त्याला टोचून बोलणे म्हणत नाही. असे सांगत मीही कोणी विचारले तर शिवसेनेने माझ्यावर हल्ले केल्याचा इतिहास सांगतो. याचा अर्थ टिकाटिप्पणी होत नाही तर तो इतिहास सांगितला जातो. असे सांगतांना भुजबळांनी येथे देखील शिवसेनेविषयी सहानुभूतीचे बोल व्यक्त केले. या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते उपस्थित झाले होते. भुजबळांचे इतर पक्षाचे आणि इतर नेते भुजबळांचे गोडवे गाण्यात सारेच जण व्यस्त असल्याचे दिसले.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…