मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार नाही. या कायद्यात बदल केला जाईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार नाही. या कायद्यात बदल केला जाईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
शेतकरी आंदोलनांची केंद्र सरकारने दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
शेतकरी आंदोलनाचा स्वार्थासाठी गैरफायदा घेण्याचा अनेकांचा प्रयत्न, खासदार सनी देओल यांची टीका
पाटील म्हणाले की, केंद्राने केलेल्या कायद्यात कोताही बदल केलेला नाही. जे जुन्या कायद्यात होते, तेच कायम आहे. फक्त या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली आहे. प्रश्न फक्त एमएसपीचा होता. केंद्र सरकार लिखित स्वरुपात एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आंदोलन आणि भारत बंद करणं याला काही अर्थ नाही, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नसल्याचा पुनर्उच्चार केला.
chandrkant patil farmers protest news