Monday, 5 May 2025
  • Download App
    राहुल गांधींनी जे टाळले तेच मल्लिकार्जुन खर्गे बोलले; नेहरूंचे नाव घेतले; भाजपच्या हातात कोलीत दिले...!! Centre is conspiring to sell assets brought by Jawaharlal Nehru in public sector to some capitalists.

    राहुल गांधींनी जे टाळले तेच मल्लिकार्जुन खर्गे बोलले; नेहरूंचे नाव घेतले; भाजपच्या हातात कोलीत दिले…!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या assets monetization pipeline विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी खरपूस टीका केली आहे. यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील सामील झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या मालमत्ता विक्री आणि भाड्याने देण्याच्या निर्णयावर टीका केली. पण त्यावेळी त्यांनी “जे” बोलणे टाळले “तेच” नेमके आज काँग्रेसचे राज्यसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे बोलून गेले. Centre is conspiring to sell assets brought by Jawaharlal Nehru in public sector to some capitalists.

    राहुल गांधींनी सरकारवर टीका करताना पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेण्याचे टाळले होते. त्यांनी फक्त गेल्या 75 वर्षात भारताने जे कमावले आहे, ते मोदी सरकार भांडवलदारांना विकते आहे, अशी टीका केली होती. या टीकेला माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दुजोरा दिला होता.

    “पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात गेल्या 75 वर्षात देशाने काही कमावले नाही, तरी देखील गेल्या 75 वर्षात देशाने जे कमावले, ज्या सार्वजनिक मालमत्तांची निर्मिती केली त्या सार्वजनिक मालमत्ता त्यांचे सरकार विकत आहे,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या assassets monetization pipeline चा समाचार घेतला होता. त्यावेळी त्यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेतले नव्हते.

    परंतु आज खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर टीका करताना पंडित नेहरू यांचे नाव घेतले. ते म्हणाले, की पंडित नेहरूंनी सार्वजनिक क्षेत्रात जे निर्माण केले त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार झाला. मोदी सरकार नेहरूंनी निर्माण केलेल्या मालमत्ता विकते आहे. त्यामुळे देशातल्या गरीब, ओबीसी, मागासवर्गीय यांचा रोजगार कायमचा बुडणार आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्री कायम पंडित नेहरूंना राजकीयदृष्ट्या टार्गेट करत असतात. जे काही केले ते एकाच कुटुंबाने केले. बाकीच्या कोणीही काही केले नाही. अशी काँग्रेसची धारणा आहे, अशी टीका भाजपचे नेते कायम करताना दिसतात. त्यामुळेच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना पंडित नेहरू यांचे नाव घेण्याचे टाळले होते. पण नेमके त्यावरच आज मल्लिकार्जुन खरगे यांनी पाणी फेरले. त्यांनी नेहरू पंडित नेहरूंचे नाव घेतल्यामुळे आता काँग्रेसला राजकीय तडाखे देण्याची संधी भाजपला परत मिळाली आहे.

    Centre is conspiring to sell assets brought by Jawaharlal Nehru in public sector to some capitalists.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??

    Icon News Hub