• Download App
    कॅप्टन साहेब स्लॉग ओव्हर्समध्ये तडाखेबंद खेळी करतीलही, पण ती कोणाच्या पथ्यावर पडेल?? Captain Amarinder Singh and BJP will may have secret understanding in Punjab Assembly elections to damage Congress poll prospects

    कॅप्टन साहेब स्लॉग ओव्हर्समध्ये तडाखेबंद खेळी करतीलही, पण ती कोणाच्या पथ्यावर पडेल??

    कॅप्टन साहेब आणि भाजप यांच्यासाठी पंजाबमध्ये एक प्रकारे No loss but probably little gain अशी स्थिती आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये ती politically कशी work होऊ शकते याची चाचपणी कॅप्टन साहेब आणि भाजप करीत आहेत. कॅप्टन साहेबांच्या अमित शहा यांच्याशी झालेल्या कालच्या चर्चेकडे या दृष्टीने पाहता येऊ शकेल, असे वाटते. Captain Amarinder Singh and BJP will may have secret understanding in Punjab Assembly elections to damage Congress poll prospects


    विनायक ढेरे

    काँग्रेसच्या मुरलेल्या वरिष्ठ नेत्यांचे एक वैशिष्ट्य आहे, ते आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस अशा काही खेळी करतात की तिच्यामुळे काँग्रेसश्रेष्ठी एक प्रकारे अडचणीत येतात.

    याची ऐतिहासिक उदाहरणे अनेक असली तरी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह ही यांची नजीकच्या इतिहासातली उदाहरणे ठळकपणे देता येतील. प्रणव मुखर्जी आणि नटवर सिंह यांनी आपल्या आत्मचरित्रांमधून काँग्रेस श्रेष्ठींसंदर्भात “असे काही” उल्लेख केले आहेत, की ते काँग्रेस नेतृत्वाला कायमचे अडचणीचे ठरावेत.

    काँग्रेस श्रेष्ठींकडून या दोन्ही नेत्यांनी एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्व पदे मिळवली. परंतु त्यांना जी पदे अपेक्षित होती ती न मिळाल्याची खंत या नेत्यांनी अशाप्रकारे व्यक्त केली, की त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला एक प्रकारे लख्ख आरसा दाखविला गेला. नेतृत्वाची राजकीय प्रतिमा पूर्ण डागाळली नाही तरी डॅमेज नक्की झाली.

    असे डॅमेज करणाऱ्या नेत्यांमध्ये आता आणखी एका नेत्याची भर पडत आहे. त्यांचे नाव कॅप्टन अमरिंदरसिंग असे आहे…!! पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री. कॅप्टन साहेबांचे वय 79 आहे. राजकीय कारकिर्दीत त्यांना आता काहीही मिळवायचे राहिलेले नाही. आणि त्यांच्या मनात असले तरी काँग्रेसचे नेतृत्व त्यांना काहीही देण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत कॅप्टन साहेब यांची राजकीय कारकीर्द क्रिकेटमधल्या स्लॉग ओव्हर्स सारखी उरली आहे.



     

    स्लॉग ओव्हर्समध्ये कोणतेही फलंदाज ज्या धावा गोळा करतात, त्या आपल्या संघाला उपयुक्त ठराव्यात या हेतूने करत असतात. उभे-आडवे फटके मारुन जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा त्यांचे प्रयत्न असतात. ते प्रतिस्पर्धी संघाचे टार्गेट जास्तीत जास्त वाढवून ठेवतात.

    कॅप्टन साहेबांची सध्याची खेळी अशाच स्लॉग ओव्हर्समध्ये पोहोचली आहे. अशा वेळी कॅप्टन साहेब आपली राजकीय बॅट कशी उभी आडवी फिरवतात? कसे फटके मारतात?, यावर त्यांचे स्वतःचे काहीही भवितव्य अवलंबून नाही. पण काँग्रेस पक्षाचे निश्चित भवितव्य अवलंबून आहे. कॅप्टन साहेब हे काँग्रेससाठी अवघड जागेचे दुखणे झाले आहे. कॅप्टन साहेबांना पुढच्या राजकीय इनिंगमध्ये सत्ता मिळाली तरी मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही हा काँग्रेसचा नेतृत्वाचा निर्णय पक्का झालेला आहे. प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धू या कॅप्टन साहेबांच्या कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी नेत्याची नियुक्ती करून काँग्रेस नेतृत्वाने आपला मनसुबा प्रकटही केला आहे. त्यामुळेच आपल्या अखेरच्या ओव्हर्समध्ये देखील काँग्रेस नेतृत्व आपले ऐकत नाही, ही कॅप्टन साहेबांची खरी खंत आहे.

    अशावेळी त्यांच्यासारखा कसलेला अनुभवी राजकीय फलंदाज कशी खेळी करेल?, त्याची चुणूक कॅप्टन साहेबांनी कालच दाखवली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी “समाधानकारक” चर्चा केल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे घर गाठले. तेथे त्यांच्याशी पंजाबमधल्या कायदा-सुव्यवस्था, दहशतवादाचा संभाव्य धोका याविषयी चर्चा केली. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या तो कर्तव्याचा भाग आहे.

    पण त्याहीपेक्षा त्यांनी जी महत्त्वाची राजकीय चर्चा केली, त्यामध्ये कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन हे विषय होते. कॅप्टन साहेबांनी अमित शहा यांना कृषी कायद्यांच्या संदर्भात “मध्यस्थी” करण्याची विनंती केली. शेतकरी आंदोलनात पंजाब मध्ये काही विशिष्ट शक्ती घुसल्या आहेत. त्या गैरफायदा घेऊन पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसे होऊ देऊ नका. मध्यस्थी करून कृषी कायद्यांच्या संदर्भात तोडगा काढा, ही विनंती कॅप्टन साहेबांनी अमित शहा यांना केली आहे.

    मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन साहेबांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेचे ट्विट करण्यात आलेले आहे. परंतु सोनिया गांधी यांना भेटल्याचे
    ट्विट करण्यात आलेले नाही.

    … आणि इथेच कॅप्टन साहेबांच्या राजकीय खेळीची “मेख” आहे. कॅप्टन साहेबांनी अमित शहा यांना मध्यस्थीची विनंती केली असली तरी कृषी कायद्यांवर तोडगा निघणे हे काँग्रेसला खरेच हवे आहे काय?, काँग्रेसच्या राजकीय पथ्यावर पडणारी ही गोष्ट आहे काय?, काँग्रेसला कृषी कायद्यासंदर्भात तोडगा काढण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे काय?, या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. उलट काँग्रेसला कृषी कायद्यांवरून हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशात वातावरण जितके पेटलेले राहील तितके हवेच आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत कृषी कायद्यांचा मुद्दा त्यांना
    ताणायचा आहे. तो ताणला गेला तर काँग्रेसचा राजकीय लाभ होऊ शकतो, हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा होरा आहे.

    अशा स्थितीत कॅप्टन साहेबांनी नेमकी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या मनसूब्या विरोधात भूमिका घेऊन अमित शहांना शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे या विषयात “मध्यस्थी” करण्याची “विनंती” करणे हे काँग्रेसच्या नेतृत्वाला कितपत रुचणारे आहे?, याचेही उत्तर नकारार्थी आहे. याचा अर्थच कॅप्टन साहेबांचा मनसूबा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाचा मनसूबा हे परस्पर विरोधी आहेत.

    कॅप्टन साहेबांची स्लॉग ओव्हरची खेळी अशी वेगळ्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. कॅप्टन साहेबांची राजकीय कारकीर्द अस्ताकडे चालली आहे. अकाली दलाने भाजपशी पूर्ण फारकत घेतली आहे. त्यामुळे
    भाजपला राज्यामध्ये गमावण्यासारखे देखील काही उरलेले नाही. भाजपचे अस्तित्व तिथे राजकीय दृष्ट्या तोळामासाच आहे.

    अशा स्थितीत कॅप्टन साहेबांची थेट किंवा प्रत्यक्ष जरी मदत झाली नाही, तरी अप्रत्यक्ष कोणत्या प्रकारे मदत होऊ शकते याची चाचपणी भाजप सध्या करीत आहे. कॅप्टन साहेबांची राजकीय खेळी देखील त्याला अनुकूल ठरताना दिसत आहे. काँग्रेसचे राजकीय भवितव्य ते डॅमेज करू शकतात. काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांना हवी तशी राजकीय मूभा पंजाबमध्ये दिली नाही म्हणून काँग्रेसचा पराभव झाला हे कॅप्टन साहेब दाखवून देऊ शकतात. ही सुद्धा भाजपसाठी जमेची बाजू ठरणारी गोष्ट आहे.

    कॅप्टन साहेब आणि भाजप यांच्यासाठी पंजाबमध्ये एक प्रकारे No loss but probably little gain अशी स्थिती आहे.  येत्या सहा महिन्यांमध्ये ती politically कशी work होऊ शकते याची चाचपणी कॅप्टन साहेब आणि भाजप करीत आहेत. कॅप्टन साहेबांच्या अमित शहा यांच्याशी झालेल्या कालच्या चर्चेकडे या दृष्टीने पाहता येऊ शकेल, असे वाटते.

    Captain Amarinder Singh and BJP will may have secret understanding in Punjab Assembly elections to damage Congress poll prospects

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!