• Download App
    सर्वसमावेशकतेकडे भाजपची झेप; पण विश्लेषकांचे डोके अडकले "शेठजींच्या पक्षात"!! BJP's leap towards inclusiveness

    सर्वसमावेशकतेकडे भाजपची झेप; पण विश्लेषकांचे डोके अडकले “शेठजींच्या पक्षात”!!

    दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती 25 डिसेंबर ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी 11 फेब्रुवारी या कालावधीत भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांना महत्त्वाचा उपक्रम देऊन जनतेशी जोडून घेण्याची संधी दिली आहे. 5 रुपये ते 1000 रुपये अशी देणगी मिळवण्यास संबंधीचा हा उपक्रम आहे. BJP’s leap towards inclusiveness

    जनतेच्या आर्थिक योगदानातून निवडणुका व्हाव्यात. निवडणूक फंड स्वतंत्र असावा, अशा सूचना गेल्या 70 वर्षांमध्ये अनेकदा झाल्या आहेत. परंतु प्रत्येक वेळी सत्ताधारी पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा याबाबत 36 चा आकडा राहिलेला आहे. त्या पलिकडे जाऊन भाजपने आज देणगी उपक्रमाला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः 1000 रुपयांची देणगी देत उपक्रमाची सुरुवात केली आहे.

    या देणगी उपक्रमाचे वैशिष्ट्य असे, की नमो ॲपवर विशेष डोनेशन फीचर करून ही देणगी ऑनलाइन स्वीकारली जात आहे. याचा अर्थ डिजिटल पेमेंटला यातून मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत आहे. कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचा भाजपने हा देशव्यापी उपक्रम चालवला आहे. सुमारे दीड महिना चालणाऱ्या या उपक्रमात नेमके आर्थिक दृष्ट्या किती यश येते, यापेक्षा कार्यकर्त्यांना अधिक महत्त्वाचा उपक्रम मिळाला आहे, या दृष्टिकोनातून भाजपचे नेतृत्व विचार करत असेल तर त्यात गैर काही नाही. किंबहुना भाजप सर्वसमावेशकतेकडे निघाल्याचे ते प्रतीक आहे. त्याच बरोबर सार्वजनिक आर्थिक व्यवहारांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राहावी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो आग्रह आहे, त्यातून नमो ॲप मध्ये विशेष फिचर तयार करून 5 रुपये ते 1000 रुपयांपर्यंतची देणगी स्वीकारली जाणार आहे. डिजिटल पेमेंटमुळे यात पारदर्शकता वेगळी आणण्याची गरज नाही. पक्षाला मिळेल देणगी ती उघड स्वरूपात सर्वांना दिसू शकेल.

    परंतु, या भाजपच्या उपक्रमाकडे पक्षाचे टीकाकार आणि राजकीय विश्लेषक मात्र जुन्याच राजकीय चष्म्यातून बघून टीकास्त्र सोङताना दिसत आहेत. “शेठजी भटजींचा” पक्ष ही भाजपची आणि त्या आधीच्या जनसंघाची प्रतिमा वर्षानुवर्षे राजकीय विश्लेषकांनी रंगविली आहे. तू चष्मा अजूनही राजकीय विश्लेषक स्वतःच्या डोळ्यांवरून उतलवायला तयार नाहीत.

    खरे म्हणजे भाजप 1980 च्या दशकामध्येच त्या प्रतिमेपलिकडे कधीच निघून गेला आहे. 1985 च्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर भाजपचे लोकसभेतील संख्याबळ हे कायम “डबल डिजिट” पासून वरच राहिले आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये तर भाजपने तीन आकडी संख्येसह संपूर्ण बहुमत मिळवले आहे. भाजप आणि शेठजी – भटजींचा पक्ष राहिला असता तर त्या पक्षाला एवढे मोठे यश देशव्यापी निवडणुकीत मिळाले असते का याचा साधा विचार देखील :शेठजी भटजींच्या” विश्लेषणात अडकून पङलेल्या या राजकीय विश्लेषकांना करता येत नाही…!!

    भाजपने जाणीवपूर्वक पावले टाकून स्वतःला सर्वसमावेशक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाचे कोणतेही उपक्रम जाती-धर्मावर आधारित ठेवायचे नाहीत हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. त्याचे टीकात्मक विश्लेषण करण्याऐवजी फक्त शेठजी – भटजींचा पक्ष एवढ्याच मर्यादेत राहून राजकीय विश्लेषक भाजपला ठोकताना दिसत आहेत.

    शेठजी भटजींच्या पक्ष या प्रतिमेपलिकडे भाजप केव्हाच निघून गेला आहे, पण विश्लेषक मात्र आपल्या जुन्याच विश्लेषणाच्या कर्दमात पूर्ण अडकलेले दिसत आहेत. त्यामुळेच देणगी उपक्रमाच्या बातम्या चालवताना राजकीय विश्लेषकांनी भाजपला शेठजींचा पक्ष ही प्रतिमा बदलण्यासाठी उपक्रम केला आहे, असे म्हटले आहे. यात राजकीय अथवा सामाजिक तथ्य कमी पण विश्लेषकांचे स्वतःच्याच बौद्धिक गुलामगिरीत अडकणे जास्त दिसून येत आहे.

    BJP’s leap towards inclusiveness

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!