• Download App
    औरंगाबादेत भाजपचे कार्यकर्ते देताहेत गृह विलगीकरणातील रूग्णांना मानसिक आधार; घेताहेत फीडबॅक आणि सोडवत आहेत अडचणी… BJP workers in Aurangabad calling giving emotional and psychological support to home isolation patients

    औरंगाबादेत भाजपचे कार्यकर्ते देताहेत गृह विलगीकरणातील रूग्णांना मानसिक आधार; घेताहेत फीडबॅक आणि सोडवत आहेत अडचणी…

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : कोरोनाच्या दुसरया लाटेमध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थादेखील सक्रिय आहेत. कोणी कोविड सेंटर उभे केले आहे, कुणी भोजनाची व्यवस्था करीत आहेत, तर कोणी प्लाझमा व रक्तदानासाठी प्रयत्न करीत आहेत… BJP workers in Aurangabad calling giving emotional and psychological support to home isolation patients

    एकीकडे या गरजा आवश्यक असताना दुसरीकडे रूग्णांना, विशेषतः गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना मानसिक व भावनिक आधार देणेही गरजेचे असल्याचे जाणवले आहे. ही गरज ओळखून औरंगाबादमधील भाजपचे कार्यकर्ते गृह विलगीकरणातील रूग्णांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही आवश्यक गरजा असतील तर महापालिकेच्या संबंधित अधिकारयांकडे त्याची माहिती देत आहेत.



    भाजपच्या राष्ट्रीय सचिव व औरंगाबादच्या माजी महापौर विजया रहाटकर यांच्या पुढाकारातून हे प्रयत्न चालू आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे देशभर ‘सेवेसाठी संघटन’ हे अभियान चालविले जात आहे. याच अभियानातंर्गंत भाजपचे कार्यकर्ते गृह विलगीकरणातील सुमारे पाचशे रूग्णांच्या दैनंदिन संपर्कात आहेत.

    विजया रहाटकर
    राष्ट्रीय सचिव, भाजपा


     

    “एकूण रूग्ण संख्येच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रूग्ण हे गृह विलगीकरणामध्ये (होम आयसोलेशन) असतात. एका अर्थाने त्यांचा आरोग्य यंत्रणांवर थेट भार नसला तरीही गृह विलगीकरणात असलेल्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यापैकी सर्वाधिक महत्वाचा भाग म्हणजे मानसिक व भावनिक आधार. दुर्देवाने याकडे फार लक्ष दिले जात नाही किंवा सद्यस्थितीत ते देता येणे, आरोग्य यंत्रणांना शक्य नाही. म्हणून आम्ही मानसिक व भावनिक धीर (सायकोलाॅजिकल कौन्सिलिंग) देण्यासाठी एखाद्या हेल्पलाइनसारखे काम करीत आहोत,” असे विजया रहाटकर यांनी सांगितले.

    यासाठी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांचे सहकार्य आहे. रूग्णांकडून मिळत असलेला फीडबॅक दररोज महापालिकेच्या संबंधित अधिकारयांना दिला जात आहे, जेणेकरून रूग्णांना वेळेत मदत पोहोचविणे शक्य होत आहे.

    BJP workers in Aurangabad calling giving emotional and psychological support to home isolation patients

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…