वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या (डिसीसी) निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 75 जागा जिंकल्या असून तो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तसेच मतांच्या टक्केवारीतही भाजपने गुपकार आघाडीला लोळविले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करुन दिली. bjp polled 38.74%, gupkar gang polled 32.92% votes in ddc elections in jammu and kashmir
भाजपला 38.74% मते आणि गुपकर आघाडीला एकूण मिळून 32.92% मते पडली आहेत. भाजपाला एकूण 4,87, 364 मते मिळाली. दुसरीकडे नॅशनल काँफेरन्स, कॉंग्रेस, पीडीपी यांना मिळून एकूण 477000 मते पडली आहेत. जी भाजपाच्या मतांपेक्षा कमी आहेत. bjp polled 38.74%, gupkar gang polled 32.92% votes in ddc elections in jammu and kashmir
जम्मू-काश्मीरमधील डीडीसी निवडणुकीचे प्रभारी आणि खासदार अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, डीडीसी निवडणुकीत लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. 51% पेक्षा जास्त मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत जे खूप चांगले होते.
bjp polled 38.74% gupkar gang polled 32.92% votes in ddc elections in jammu and kashmir
गुपकार आघाडीतील अनेक पक्ष भाजपा आणि मोदी जी यांना आव्हान देण्यासाठी जमले होते. परंतु निडवणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये आघाडी करून भाजपाला मुळापासून उखडून टाकण्याचे मनसुबे मात्र धुळीस मिळाले आहेत. भाजपाला सर्वाधिक 75 जागा मिळाल्या आहेत,असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.