• Download App
    भाजपाने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले; उत्तर भारतात चौघांचा तर दक्षिण भारतातील एकाचा समावेश BJP changed five chief ministers in six months; Four in North India and one in South India

    भाजपाने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले; उत्तर भारतात चौघांचा तर दक्षिण भारतातील एकाचा समावेश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भाजपने गेल्या सहा महिन्यात पाच राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत. केंद्रात २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आला. त्यानंतर विरोध वा टीका झाली तरीही मुख्यमंत्री बदलण्याचे टाळणाऱ्या भाजपाने गेल्या सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. BJP changed five chief ministers in six months; Four in North India and one in South India

    लोकांची नाराजी, पक्षनेतृत्वाचा विश्वास गमाविणे किंवा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवूनच भाजपाने मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंडमध्ये मार्चमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तिरथसिंह रावत यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली होती. लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांना सहा महिन्यांच्या मुदतीत विधानसभेवर निवडून येणे शक्य नव्हते. त्यामुळे अवघ्या ११४ दिवसांमध्येच रावत यांना राजीनामा द्यावा लागला. चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत उत्तराखंडमध्ये भाजपाने दोन मुख्यमंत्री बदलले.



    आसामध्ये गेल्या मे महिन्यात भाजपा पुन्हा सत्तेत येताच सर्वानंद सोनोवाल यांना बदलून भाजपाने हेमंत बिश्वा सरमा यांची निवड केली होती. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषविताना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्याच दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास पक्षाने भाग पाडले होते. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका सव्वा वर्षावर येऊन ठेपल्या असताना विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    BJP changed five chief ministers in six months; Four in North India and one in South India

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…