विशेष प्रतिनिधी
पुणे : अवघे आयुष्य शिवकाळाचा जागर करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ओजस्वी भाषेत मांडणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे गुरुवारी वयाच्या शंभरीत प्रवेश करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा अपवाद वगळता महाराष्ट्रातील नेत्यांनी मात्र जातीपातीच्या राजकारणात अडकून बाबासाहेबाना शुभेच्छा देण्याचे टाळले आहे. Birthday wishes to Shivshahir Babasaheb Purandare from Union Home Minister Amit Shah, Except Thackeray Brothers other leaders from Maharashtra keep distance
अमित शहा यांनी ट्विट करून शुभेच्छा देताना म्हटले आहे की शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे आज शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ओजस्वी वाणी, अलौकिक लिखाण व जाणता राजा च्या माध्यमातून आपण छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचवला. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस सुदृढ, निरोगी आयुष्य लाभो, ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना! शहा यांनी बाबासाहेबांचा सन्मान करतानाच फोटोही ट्विट केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विटरवरून शुभेच्छा देताना म्हटले आहे की महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेजी यांना वाढदिवसाच्या आदरपूर्वक शुभेच्छा! शिवतेज मनामनात पोहचवण्याचा ध्यास घेतलेल्या बाबासाहेबांकडून ही सेवा निरंतर घडत राहो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज घरी जाऊन बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे की महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी को जन्मदिवस की बहुत-बहुत शुभकामनाएं। माँ भगवती से आपके उत्तम स्वास्थ्य एवं दीर्घायु की कामना करता हूं।
मात्र महाराष्ट्रातील इतर नेत्यांनी विशेषतः कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शुभेच्छा देण्याचे टाळले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी सार्वजनिकरित्या शुभेच्छा दिल्या नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जाहीर शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांच्या पवार स्पिक्स या अधिकृत ट्विटर हँडलरवर गुरुवारी व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा आहेत मात्र बाबासाहेब यांना शुभेच्छा नाहीत.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनीही मराठीतील ज्येष्ठ लेखक म्हणूनही बाबासाहेबाना शुभेच्छा देणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या ट्विटर हँडलरवर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अशोक पाटील निलंगेकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आहेत मात्र बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख नाही.
Birthday wishes to Shivshahir Babasaheb Purandare from Union Home Minister Amit Shah, Except Thackeray Brothers other leaders from Maharashtra keep distance
महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सेबीने ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड, नियमांचे केले उल्लंघन
- घराणेशाही वाचविण्यासाठीच कॉँग्रेस, शिवसेनेसेह विरोधी पक्ष एकत्र, संबित पात्रा यांचा आरोप
- सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जलवा, ट्विटर अकाऊंट सात कोटी फॉलोअर्स
- टाटा मोटर्स पुढील आठवड्यात वाढविणार मोटारींच्या किंमती, टियोगो, नेक्सॉन, हैरियार आणि सफारी होणार महाग
- बड्या घरचे श्वान शोधण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा लागली कामाला, पाकिस्तानातील गुजराणवाला येथील प्रकार