विशेष प्रतिनिधी
पाटणा – सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर लाइक केल्याबद्दल आणि त्यानंतर तोच मजकूर इतरांना पाठविल्याबद्दल कोयलादेवा गावातील एका युवकाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम कुरेशी असे या युवकाचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. Bihar youth shared vdo of terrorist
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलीमने एका विदेशी दहशतवाद्याचा, हातात शस्त्र घेऊन देशाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करतानाचा व्हिडिओ `लाइक` केला होता. तसेच तो व्हिडिओ त्याने अनेक मित्रांनाही पाठविला होता.
सलीमची पार्श्वेभूमी गुन्हेगारी स्वरुपाची नाहीये, त्यामुळे त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. सर्व गोष्टींचा तपास करून आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
Bihar youth shared vdo of terrorist
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर ; पुण्यात गुरुवारी वितरण
- लाचखोरी प्रकरणात अनिल देशमुख यांचा वकील आणि सीबीआय सब इन्स्पेक्टरला दोन दिवस न्यायालयीन कोठडी
- Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची याचिका नाकारली, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश