केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तयार केलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती नियम २०२० नुसार, ट्रान्सजेंडर उमेदवारांना जिल्हा दंडाधिकार्यांकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.Big decision of Karnataka government; Reserved seats reserved for transgender candidates in state police recruitment
विशेष प्रतिनिधी
कर्नाटक : कर्नाटक सरकारने राज्य पोलीस भरतीमध्ये ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्या आहेत. प्रथमच, ट्रान्सजेंडर राज्य पोलिस भरतीसाठी अर्ज करु शकतील. राज्य सरकारने कर्नाटक नागरी सेवा नियम, १९७७ मध्ये बदल करुन ट्रान्सजेंडरसाठी एक टक्के नोकऱ्या राखून ठेवल्या आहेत.
पोलीस विभागाने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.अधिसूचना अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी ही भरती काढली आहे.केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तयार केलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती नियम २०२० नुसार, ट्रान्सजेंडर उमेदवारांना जिल्हा दंडाधिकार्यांकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, कर्नाटक राज्य राखीव पोलीस (KSRP) साठी विशेष राखीव उपनिरीक्षकाची चार पदे आणि विशेष राखीव उपनिरीक्षक पदाच्या भारतीय राखीव बटालियनमधील एक पद ट्रान्सजेंडरसाठी राखीव असेल.
७० पैकी पाच पदे ट्रान्सजेंडरसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पात्र ट्रान्सजेंडर उमेदवार या पदांसाठी १८ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. याशिवाय, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) मध्ये ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी सीन ऑफ क्राइम ऑफिसर (SOCO) साठी ३ पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. १५ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
Big decision of Karnataka government; seats reserved for transgender candidates in state police recruitment
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात लोकशाही बंद, केवळ ‘रोक’शाही किंवा ‘रोख’शाही सुरू, देवेंद्र फडणवीसांची झंझावाती पत्रकार परिषद, वाचा सविस्तर..
- नागपुरामध्ये अधिवेशन होत नसल्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना ३०० कोटीचा तोटा
- लस प्रमाणपत्रावरचा मोदींचा फोटो हटवण्याची मागणी आली अंगलट ; भरावा लागणार १ लाख रुपयांचा दंड
- महाराष्ट्र २४ तासांत आणखी गारठणार ! थंडीचा हुडहुडी वाढेल;हवामान तज्ज्ञांचा इशारा