Covaxin for children : देशातील मुलांसाठी कोरोना लस मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुलांसाठी भारत बायोटेकची लस मंजूर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकची लस 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाईल. विशेष म्हणजे, भारत बायोटेक ही भारतातील पहिली कंपनी आहे जिने लहान मुलांसाठीच्या लसीवर चाचणी घेतली. त्यांची चाचणी दिल्लीच्या एम्समध्ये झाली, त्यानंतर कंपनीने अहवाल सादर केला. अहवालाच्या आधारे आरोग्य मंत्रालयाने ही लस मंजूर केली आहे. Bharat Biotech COVID 19 vaccine Covaxin for children 2 to 18 years Old gets approval from ministry of health
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील मुलांसाठी कोरोना लस मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुलांसाठी भारत बायोटेकची लस मंजूर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकची लस 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाईल. विशेष म्हणजे, भारत बायोटेक ही भारतातील पहिली कंपनी आहे जिने लहान मुलांसाठीच्या लसीवर चाचणी घेतली. त्यांची चाचणी दिल्लीच्या एम्समध्ये झाली, त्यानंतर कंपनीने अहवाल सादर केला. अहवालाच्या आधारे आरोग्य मंत्रालयाने ही लस मंजूर केली आहे.
एक आठवड्यापूर्वी, भारत बायोटेकने 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोविड -19 लस कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण केले. त्याची वैधता आणि आपत्कालीन वापर मंजुरीसाठी डेटा केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संघटनेने सादर केला आहे.
सप्टेंबरमध्ये चाचणी पूर्ण
लसीशी संबंधित चाचण्यांबद्दल सांगायचे झाल्यास, सप्टेंबरच्या अखेरीस भारत बायोटेकने 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना वापरण्यासाठी कोरोनारोधी लस कोव्हॅक्सिनच्या चाचणीचा दुसरा व तिसरा टप्पा पूर्ण केला. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले की, मुलांसाठी लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि डेटाचे विश्लेषण करून लवकरच मंजुरीसाठी मंत्रालयाकडे पाठवले जाईल. यादरम्यान, कंपनीने म्हटले होते की, ऑक्टोबरमध्ये कोव्हॅक्सिनचे उत्पादन 55 दशलक्ष डोसपर्यंत पोहोचेल, जे सप्टेंबरमध्ये 35 दशलक्ष डोस होते.
नेझल व्हॅक्सिनची चाचणीही लवकरच पूर्ण होणार
भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या कोविड -19 अँटी-इंट्रानेझल लसीची (नाकावाटे लस) दुसऱ्या टप्प्यातील चाचणीदेखील या महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भारत बायोटेकच्या मते, इंट्रानेझल लस नाकामध्येच रोगप्रतिकारक प्रतिसाद मिळवू शकते जे कोरोना विषाणूचे प्रवेशद्वार आहे. अशा प्रकारे रोग, संसर्ग आणि संक्रमणापासून संरक्षण प्रदान होते.
इंट्रानेझल लसीची तीन गटांवर चाचणी केली जात आहे, त्यापैकी एक कोव्हॅक्सिन लस पहिला डोस म्हणून आणि इंट्रानेझल लस दुसरा डोस म्हणून दिली गेली. त्यांनी सांगितले की अशाप्रकारे दुसऱ्या गटाला फक्त इंट्रानेझल लस देण्यात आली आहे, तर तिसऱ्या गटाला 28 दिवसांच्या अंतराने इंट्रानेझल आणि कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे.
Bharat Biotech COVID 19 vaccine Covaxin for children 2 to 18 years Old gets approval from ministry of health
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : पाकिस्तानी दहशतवाद्याला एके-47 सह दिल्लीत अटक, देशाच्या राजधानीत घातपाताचा कट उधळला
- मोठी बातमी : मुंद्रा बंदरातील ड्रग्ज जप्तीप्रकरणी राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये NIAचे 5 ठिकाणी छापे
- G20 Leaders Summit : अफगाणिस्तान मुद्द्यावर आज जी-20 नेत्यांची शिखर परिषद, पंतप्रधान मोदी होणार सहभागी
- ADR : शिवसेनेसह 14 पक्षांना निवडणूक रोख्यांमधून 50 टक्के देणगी, टीआरएसला मिळाले 130 कोटी रुपये
- Lakhimpur Kheri : प्रियांका गांधी ‘अंतिम अरदास’मध्ये होणार सहभागी, व्यासपीठावर येऊ देणार नसल्याचे बीकेयूकडून स्पष्ट