विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर बंगालमध्ये हल्ला झाल्यानंतर त्या राज्यातून “बेंगॉल सपोर्टस बीजेपी” हा ट्रेंड सोशल मीडियावर जोरात सुरू झाला असून गुंडांच्या गर्दीतून नड्डांच्या ताफा चालला आहे. तृणमूळचे कार्यकर्ते लाठा काठ्या घेऊन रस्त्याच्या दुतर्फा गुंडगिरी करताहेत, असे विडिओ बंगालमधून देशभर व्हायरल होताहेत. bengal supports bjp goes strong
दगडफेक झालेल्या कारचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून यामध्ये कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करत काचा फोडल्याचे दिसत आहे. हल्ल्यात पक्षाचे नेते मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाल्याचे खुद्द नड्डा यांनीच सांगितले आहे. भाजपा नेते कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. bengal supports bjp goes strong
हल्ल्यानंतर नड्डा हे डायमंड हार्बरला पोचले. त्यांनी तेथे सभेला संबोधित केले. ते म्हणाले, “आज झालेल्या हल्ल्यात मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाले आहेत. लोकशाहीसाठी ही लज्जास्पद घटना आहे. ताफ्यात हल्ला झाला नाही अशी कोणतीही कार नाही. मी बुलेटप्रूफ कारमध्ये होतो म्हणून सुरक्षित आहे. पश्चिम बंगालमधील अराजकता आणि असहिष्णुता संपवावी लागेल. जर मी आज या बैठकीत पोहोचलो आहे तर ते देवी दुर्गाच्या आशीर्वादानेच,” असेही यावेळी ते म्हणाले.
bengal supports bjp goes strong
या घटनेनंतर सोशल मीडियावर “बेंगॉल सपोर्टस बीजेपी” हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होत असून गेल्या दोन तासांपासून तो टॉप टेनमध्ये आहे. याचा अर्थ बंगालबरोबरच संपूर्ण देशभरातून बंगालमधील हिंसाचारावर संताप व्यक्त होताना दिसतो आहे.