• Download App
    सावधान ! सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन Be careful! Warning of heavy rains in Sindhudurg district; Appeal for vigilance from the weather department

    सावधान ! सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन

    प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ सप्टेंबर आणि ८ सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबतचा इशारा मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात याच काळात शेकडोंच्या संख्येने चाकरमानी मुंबई आणि अन्य भागातून जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. Be careful! Warning of heavy rains in Sindhudurg district; Appeal for vigilance from the weather department

    मुसळधार पावसाच्या या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागांना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सुद्धा सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व विभागांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेला अतिवृष्टीची पूर्वसूचना द्यावी आणि त्याप्रमाणे आवश्यक ते नियोजन संबंधितांकडून करून घ्यावे, असे निर्देश प्रशासनाच्या वतीनं दिले आहेत.

    अतिवृष्टीच्या अनुषंगानं सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती त्वरित जिल्हा नियंत्रण कक्षाला –०२३६२-२२८८४७ या संपर्क क्रमांकावर उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

    देवगड तालुक्यात ७५ मि.मी. पावसाची नोंद

    जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत देवगड तालुक्यात सर्वाधिक ७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४६.३ मि.मी. पाऊस झाला असून
    १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी ३३५४.९८२ मि.मी. पाऊस झाला आहे.

    Be careful! Warning of heavy rains in Sindhudurg district; Appeal for vigilance from the weather department

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!