• Download App
    देशभक्तीच्या रंगात रंगणार देश, बांग्ला देशात पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचा सुवर्णमहोत्सव होणार साजरा | The Focus India

    देशभक्तीच्या रंगात रंगणार देश, बांग्ला देशात पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचा सुवर्णमहोत्सव होणार साजरा

    भारताने १९७१ मध्ये बांग्ला देशमध्ये पाकिस्तानवर दैदिप्यमान विजय मिळविला. तब्बल ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना दाती तृण धरून शरण आणले. या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात देश देशभक्तीच्या रंगात रंगून जाणार आहे.  Bangladesh will celebrate the golden jubilee 


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताने १९७१ मध्ये बांग्ला देशमध्ये पाकिस्तानवर दैदिप्यमान विजय मिळविला. तब्बल ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना दाती तृण धरून शरण आणले. या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात देशवासी देशभक्तीच्या रंगात रंगून जाणार आहे. Bangladesh will celebrate the golden jubilee

    केंद्र सरकारकडून बांग्ला देश दिग्विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्याला स्वर्णिम विजय वर्ष असे नाव दिले आहे. त्याची सुरूवात १६ डिसेंबरला होणार आहे. १६ डिसेंबर रोजी नॅशनल वॉर मेमोरियल येथे हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

    संपूर्ण दिल्लीमध्ये या वेळी चारही दिशांनी मशाल यात्रा निघणार आहे. भारतीय लष्कराच्या गाड्यांतून ही मशाल यात्रा देशातील १९७१ मध्ये शौर्य पदक मिळालेल्या बहादुरांच्या प्रत्येक गावात जाणार आहे. या गावांमध्येही कार्यक्रम केले जाणार आहेत. या कार्यक्रमामध्ये कोविड -१९ च्या गाईडलाईन पाळल्या जाणार आहेत.



    त्याचबरोबर त्यासाठी एक वेबसाईटही तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये १९७१ च्या युध्दासंबंधी अनेक गोष्टी वाचायला मिळणार आहेत. बांग्ला देशी नागरिकांवर १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याकडून अनन्वित अत्याचार झाले होते. सुमारे तीन लाख लोकांना ठार मारण्यात आले होते.

    Bangladesh will celebrate the golden jubilee

    दोन लाख महिलांवर बलात्कार झाले. सुमारे ८० लाख नागरिकांनी स्थलांतरीत होऊन भारतात आश्रय घेतला होता. त्यामुळे शेवटी भारताला लष्करी कारवाई करावी लागली. ३ डिसेंबरला भारताने पाकिस्तानविरुध्द युध्द पुकारले. १६ डिसेंबरपर्यंत ते चालले. पाकिस्तानी लष्कराचे जनरल नियाझी यांच्यासह ९० हजार पाकिस्तानी सैनिक शरण आले.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…