राज्य मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. मुळात मंत्र्यांनी आंदोलनाची भाषा करू नये. त्यांनी जबाबदारीचे भान राखले पाहिजे.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : शेतकरी आंदोलनात नवटंकी करणारे राज्य मंत्री बच्चू कडू यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी चांगलेच फटकारले आहे. मंत्र्यांना आंदोलनाचा अधिकार नसतो. त्यामुळे कडू यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी अॅड. आंबेडकर यांनी केली आहे. Bachchu Kadu Prakash Ambedkar latest news
अॅड. आंबेडकर म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. मुळात मंत्र्यांनी आंदोलनाची भाषा करू नये. त्यांनी जबाबदारीचे भान राखले पाहिजे. मंत्र्यांना असे बेशिस्त वागता येत नाही.
कडू यांना आंदोलनाचा अधिकारदेखील नाही. माझ्या सारखा मुख्यमंत्री असता तर कडू यांचा राजीनामा मागितला असता. मंत्र्यांनी अगोदर स्वत:ची भूमिका व बंधने स्पष्ट करून घ्यावी. एक तर मंत्रिपदावर राहावे किंवा रस्त्यांवर येऊन आंदोलन करावे. कडू यांची भूमिका चुकली आहे, अशा स्पष्ट शब्दात आंंबेडकर यांनी त्यांना फटकारले आहे.
Bachchu Kadu Prakash Ambedkar latest news
सध्या कृषी बिलांच्या मुद्द्यावर दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या सोबत असल्याची भूमिका घेतली आहे. जर हे तीनही पक्ष खरोखर शेतकऱ्यांशी प्रामाणिक असतील तर ते महाराष्ट्रात तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी करणार नाहीत असा अध्यादेश का काढत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.