Online Classes : कोरोना संसर्गामुळे जवळपास 18 महिन्यांपासून शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये व्हर्च्युअल वर्ग सुरू आहेत. अशा स्थितीत एका अहवालाने या यंत्रणेचा पर्दाफाश केला आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारतातील 60 टक्क्यांहून अधिक मुले इंटरनेटचा वापर करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत रिमोट ऑप्शन आणि पर्यायी शिक्षण पद्धतीवर चालणाऱ्या शाळांना मोठा फटका बसला आहे. Azim Premji Foundation Study Shows 60 Percent Children In India Are Not Able To Use Internet for Online Classes
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे जवळपास 18 महिन्यांपासून शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये व्हर्च्युअल वर्ग सुरू आहेत. अशा स्थितीत एका अहवालाने या यंत्रणेचा पर्दाफाश केला आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारतातील 60 टक्क्यांहून अधिक मुले इंटरनेटचा वापर करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत रिमोट ऑप्शन आणि पर्यायी शिक्षण पद्धतीवर चालणाऱ्या शाळांना मोठा फटका बसला आहे.
अझीम प्रेमजी फाउंडेशनने केलेल्या या अभ्यासातून असे समोर आले आहे की, ६० टक्के शाळकरी मुले केवळ इंटरनेट नसल्यामुळे व्हर्च्युअल शिक्षणाशी जोडू शकलेले नाहीत. आणखी एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, केवळ ग्रामीण भागातीलच नाही तर शहरी भागातही अर्ध्याहून अधिक पालकांनी शाळांमध्ये इंटरनेट सिग्नल आणि वेगाबद्दल तक्रार केली आहे. याशिवाय मोबाइल डेटावर होणारा अवाढव्य खर्चही त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे.
केवळ 20 टक्के मुलेच ऑनलाइन वर्गात
अहवालात असे म्हटले आहे की, केवळ 20 टक्के मुले अशी आहेत, जी या महामारीच्या काळात पूर्णपणे ऑनलाइन क्लासेस घेऊ शकतात. यापैकी केवळ निम्मी मुले थेट वर्गात सामील होऊ शकतात.
38 टक्के मुलांनी शाळा सोडली
अहवालात दावा करण्यात आला आहे की, इंटरनेटच्या समस्येमुळे सुमारे 38 टक्के मुलांनी शाळा सोडली. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, 38 टक्के पालकांनी सांगितले की ऑनलाइन वर्ग योग्य मार्ग नाही. यामध्ये ऑफलाइन क्लासमध्ये जसे घडते तसे मूल शिकत नाही, त्यांना समजत नाही.
Azim Premji Foundation Study Shows 60 Percent Children In India Are Not Able To Use Internet for Online Classes
महत्त्वाच्या बातम्या
- Amravati Violence : दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक, शिवसेना नेत्यावर मात्र कारवाई नाही!
- त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार
- चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित
- ३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती , मनपा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीची औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- आठवणी बाबासाहेबांच्या : सावरकर म्हणाले होते, नाशच करायचा असेल तर काबूल पलिकडे जाऊन अब्दालीच्या घराण्याचा करा ना…!!