शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. Aurangabad : 2018 riot case, Shiv Sena MLA Pradip Jaiswal sentenced to 6 months
विविध गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिन्याची शिक्षा असली तरी ती एकत्रच भोगावयाची आहे. अतिरिक्त व जिल्हा सत्र न्या. एस. एम. भोसले यांनी शिक्षेचा निर्णय सुनावला आहे.
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : २० मे २०१८ च्या मध्यरात्री झालेल्या जातीय दंगली प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी जैस्वाल यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील खुर्चा, काचांची मोडतोड करून पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. Aurangabad :2018 riot case, Shiv Sena MLA Pradip Jaiswal sentenced to 6 months
या प्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत निवृत्ती पोटे यांनी फिर्याद दिली होती
नेमके प्रकरण काय आहे ?
20 मे 2018 रोजी औरंगाबाद शहरात दंगल उसळली होती. या दंगलीमुळे औरंगाबाद शहरात तणावाचे वातवरण निर्माण झाले होते. यावेळी एकमेकांच्या विरोधात उभे असलेल्या दोन गटांनी शहरातील अनेक दुकानांची तोडफोड तसेच जाळपोळ केली होती. यामध्ये व्यापारी तसेच दुकानदारांचे लाखोंचे नुकसान झाले होते. या प्रकरणाशी संबंधित औरंगाबाद पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
यावेळी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्याची आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मागणी केली होती. त्यांनी शहरातील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात जाऊन खुर्च्या तसेच काचांची तोडफोड केली होती. तसेच पोलिसांना शिवीगाळसुद्धा केली होती. याच आरोपाप्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत पोटे यांनी त्यावेळी फिर्याद दिली होती.
दरम्यान, पोटे यांनी फिर्याद दिल्यानंतर जैस्वाल यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली.