प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा देऊन काँग्रेस संघटनेत चैतन्य आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची जीभ पुण्याच्या कार्यक्रमात घसरली. atul bhatkalkar targets nana patole and rahul gandhi
भाषणाच्या ओघात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खालच्या पातळीवरची भाषा वापरून टीका केली. दिल्लीतल्या दोन दाढीवाल्यांचे शटर आपल्याला बंद करायचेय, असे ते म्हणाले. नानांनी घसरून केलेल्या टीकेला भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी तितकेच घसरून प्रत्युत्तर दिले आहे.
सध्या तुमचा ५१ वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय ते पाहा, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. नानांनी केलेली टीका आणि त्याला भातखळकरांनी दिलेले प्रत्युत्तर यावरून सोशल मीडियात काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसून येते. अनेकांनी एकमेकांना अपशब्द वापरत धारेवर धरले आहे. तर अनेकांनी दोन्ही – तिन्ही काय पण सगळे दाढीवाले एकच आहेत. ते देशाला लुटत आहेत, अशी टीका केली आहे.
atul bhatkalkar targets nana patole and rahul gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- चैतन्यशील आणि लवचिक शरीर निर्माण करणे गरजेचे, सद्गुरू यांचा संदेश
- आर्थिक मदतीसाठी इम्रान खान यांचा अमेरिकेला पोकळ इशारा
- कोणत्याही व्यक्तीची माघारी टिंगल करून नका
- राममंदिरासाठीच्या देणग्यांमधून उकळला जातोय फायदा – सुरजेवाला यांची टीका
- स्मरणशक्ती म्हणजे नक्की काय असते
- राजधानी दिल्ली आता वेगाने पूर्वपदावर, बहुतांश निर्बंध शिथील