Wednesday, 30 April 2025
  • Download App
    भविष्यात राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आणण्याचे प्रयत्न : जयंत पाटील Attempt to bring NCP to power on its own in future: Jayant Patil

    भविष्यात राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आणण्याचे प्रयत्न ; जयंत पाटील

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आणून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न भविष्यात केले जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. प्रसन्न जोशी यांनी त्यांची मुलखत घेतली. Attempt to bring NCP to power on its own in future: Jayant Patil

    राष्ट्रवादीच्या 21 वर्षांच्या वाटचालीचा मागोवा त्यांनी घेतला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 100 पेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सत्ता स्थापन केली. दक्षिण भारतात अनेक पक्षांना जे जमले ते राष्ट्रवादीला शरद पवार यांच्यासारखे मात्तबर नेते असताना का जमले नाही, पक्ष याबाबत का चाचपडत आहे ? या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

    राज्यात सलग तीनदा राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली आहे, असे सांगताना ते म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत आमच्या जागा वाढल्या. पूर्वी काँग्रेस राज्यात मोठा पक्ष होता आणि धाकटे भाऊ म्हणून वावरत होतो. आता चित्र बदलले असून आमच्या जागा काँग्रेस पेक्षा अधिक आहेत. परंतु समविचारी पक्षाशी आघाडी करून आम्ही राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली. त्यात शिवसेना आमच्या सोबत आली.
    आता पक्षाकडे तरुण मतदार आकर्षित होत आहेत, असे सांगताना ते म्हणाले, आमच्या क्षमता आहे. पण अनेकदा आम्हाला आघाडी करावी लागत आहे, असे ते म्हणाले.

    पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी कटू..

    पहाटेच्या शपथविधीबाबत ते म्हणाले, अजित पवार यांनी समर्थक आमदारांची यादी चोरली, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याबाबत जयंत पाटील म्हणाले, हा आरोप चुकीचा आहे. अजित पवार पक्षाचे नेते असल्याने त्यांच्याकडेच यादी असणे स्वाभावीक आहे आणि ती चोरण्याचा प्रश्नच येत नाही. अर्थात अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी कटू होत्या. त्या बद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हते. त्या दिवशी उद्धव ठाकरे यांचा सकाळी फोन आला ते म्हणाले, तुमचा शपथ झाली का ? ते एकून मला आश्चर्य वाटले. टीव्ही लावला तेव्हा उलघडा झाला. मी त्यांना सांगितले की, काळजी करू नका. आता पहाटेच्या शपथविधी प्रकरणावर पडदा पडला आहे. यावरून पक्षात मतभेद नाहीत.

    अजित पवार यांच्या प्रशासकीय कामाच्या अनुभवाचा कोरोना काळात सरकारला मोठा फायदा झाल्याचे सांगताना त्यांनी अजित पवार यांच्या कामाचे कौतुक केले.

    मराठा आरक्षणावर राष्ट्रवादी ठाम

    मराठा आरक्षण मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस चाचपडत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आरक्षणासाठी राज्यात मोर्चे निघाले. मोठा समाज आरक्षणासाठी आग्रही आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात निकाल वेगळा लागला. आता हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी नुकतीच पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे. परंतु २०१४ पूर्वी आमचे सरकार होते तेव्हा सुद्धा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर ठाम होतो आणि आहे.

    खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे ही घराणी राष्ट्रवादीपासून दुरावली आहेत. ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांना रोखण्यासाठी तर हा दिल्ली दौरा नव्हता का ? यावर ते म्हणाले, उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांना सुद्धा हा प्रश्न केंद्र सरकारचा अखत्यारीत असल्याची जाणीव झाली आहे. आता या प्रश्नी रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा संसदेत या प्रश्नाला वाचा फोडावी,असे मत त्यांनी व्यक्त केले.

    कोरोनानंतर सरकार पडणार का ?

    कोरोनानंतर सरकार पाडण्याची वल्गना विरोधी भाजप करत आहे, याबाबत ते म्हणाले, गेली दीड वर्षे आम्ही सत्तेत आहोत. सरकार पडणार आणि भाजप राजवट येणार असे ऐकून आम्ही कंटाळलो आहोत. खरे तर भाजप एकत्र ठेवण्यासाठी या सर्व वल्गना केल्या जात आहेत, असे ते म्हणाले. भाजपने सरकार पाडून सत्तेत येण्याऐवजी भाजपने विरोधी पक्ष म्हणून काम करावे, २०२४ च्या निवडणुकीकडे लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
    यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख , वाझे आणि मनसुख हिरण प्रकरणी आता एनआयए तपास करत असल्याचे सांगितले. युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांच्या नियुक्तीबद्दल ते म्हणाले, मी राज्य पातळी वरचा नेता आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही. पण, देशातील सर्व नेत्यांना शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. याबाबत सर्वांचे एकमत होईल, तेव्हा निर्णय होईल.

    Attempt to bring NCP to power on its own in future: Jayant Patil

    Related posts

    Pahalgam attack : चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची; पण प्रत्यक्षात कृती पाकिस्तानला चिथावणी‌ द्यायचीच!!

    Pahalgam attack : पाकिस्तानचा खरा सूड उगवणारे निर्णयकर्ते कामात मग्न; पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!

    जसा आजोबा, तसाच नातू; दोघांच्याही धमक्या तद्दन फालतू!!