विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र एटीएसने संशयित दहशतवादी मोहम्मद इरफान रेहमत अली शेख याला अटक केली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या झाकीर या दहशतवाद्याच्या चौकशी नंतर एटीएसने मोहम्मद इरफान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर त्याला अटक केली आहे.ATS arrests another suspected terrorist in Mumbai
संशयीत दहशतवादी झाकीर हुसेन शेख व रिझवान इब्राहिम मोमीन यांचा दहशतवाद विरोधी पथकाने (एसीटीएस) ताबा घेतला होता. ४ ऑक्टोबपर्यंत दोघांचाही ताबा एटीएसला मिळाला. या प्रकरणात आणखी एक अटक एसीटीएसने केली आहे.
या संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांशी संबंधित मुंबईतील ही तिसरी अटक आहे.
एटीएसने उघड केले की झाकीर आणि रिझवानच्या चौकशी दरम्यान मोठी माहिती समोर आली, त्यानंतर मोमीन याला नागपाडा येथील त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले आणि गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली.
ATS arrests another suspected terrorist in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित द्या नवनीत राणांनी यांचा केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आग्रह
- कॅप्टन साहेब out of the way; अजित डोवाल यांच्याशी घरी जाऊन महत्त्वपूर्ण चर्चा!!
- Bigg Boss Marathi 3 : शिवलीला पाटील बिग बॉसच्या घरातून बाहेर , घरा बाहेर पडण्याचं नक्की काय आहे कारण?
- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अटकेच्या भीतीने देश सोडून फरार?; तपास यंत्रणांना संशय