दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रत्येकच वेळी नौटंकी करण्याची सवय आहे. आम आदमी पार्टीने (आप) दिल्ली बंदला पाठिंबा देऊनही बंदचा फज्जा उडाल्यानंतर केजरीवाल यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते, असा आरोप केला आहे. arvind kejriwal update
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रत्येकच वेळी नौटंकी करण्याची सवय आहे. आम आदमी पार्टीने (आप) दिल्ली बंदला पाठिंबा देऊनही बंदचा फज्जा उडाल्यानंतर केजरीवाल यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते, असा आरोप केला आहे. arvind kejriwal update
भारत बंदच्या दिवशी मंगळवारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार आपल्याला घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. आपने म्हटले आहे की केजरीवाल सोमवारी सिंघू सीमेवरून परतल्यावर त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. arvind kejriwal update
त्याचबरोबर दिल्ली नगरनियमच्या तीनही महापौरांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यास लावण्यात आले. ही संधी साधून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बॅरीकेडींग करण्यात आली.
arvind kejriwal update
उत्तर दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की केजरीवाल घराच्या बाहेर गेले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते कपील मिश्रा यांनी केजरीवाल नौटंकी करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, केजरीवाल नजरकैदेत असल्याचा कांगावा करत आहेत. त्यांनी बाहेर येऊन पाहावे की दिल्लीतील एकही बाजार किंवा औद्योगिक परिसर बंद नव्हता. पूर्ण दिल्लीत कोठेही बंद दिसला नाही.