वृत्तसंस्था
पुणे : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता आहे, मात्र त्यानंतर पाऊस विश्रांती घेणार आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे राज्यातून परतण्यासाठी अनुकूल स्थिती असून बहुतांश भागातून मोसमी वारे माघारी परततील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. Arabian sea in konkan and central maharashtra chance of thunderstorms
अरबी समुद्रातील वाऱ्यांमुळे राज्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी विजाही कोसळल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर पाऊस विश्रांती घेणार आहे.
आज-उद्या पाऊस पडणार
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, नगर, सोलापूर आदी जिल्ह्यांत ११ ऑक्टोबरपर्यंत, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत ११ आणि १२ ऑक्टोबरला पावसाची शक्यता आहे.
Arabian sea in konkan and central maharashtra chance of thunderstorms
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल