• Download App
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणखी एका वंशाचा लागला शोध Another dynasty of Chhatrapati Shivaji Maharaj was discovered

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणखी एका वंशाचा लागला शोध

    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांंच्या वंशजांबद्दल पुरेशी माहिती आजही नाही. धुरंदर छत्रपती संभाजी राजे (पहिले) यांची सातारा गादी आणि द्वितीय राजाराम महाराज यांची कोल्हापुर गादी यांच्या वंशपरंपरेबद्दल प्रत्येक मराठी माणूस आदर बाळगून आहे. मात्र या दोन महापुरूषांच्या ज्ञात वंशवेलीव्यतिरीक्त छत्रपती शिवरायांचे अन्यही वंशज नांदत असा दावा करत त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न पुण्यातल्या संशोधकाने केला आहे. Another dynasty of Chhatrapati Shivaji Maharaj was discovered


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यश्‍लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अज्ञात शाखेचा ऐतिहासिक कागदपत्रांमधून उलगडा होत आहे. शिवाजी महाराज यांना दोन मुले झाली, पहिले संभाजी राजे द्वितीय राजाराम महाराज हे सर्वांना माहीत आहेत.मात्र या व्यतिरीक्तच्या अज्ञात शाखेचा उलगडा शिववंश या पुस्तकातून उलगडणार असल्याचा दावा पुण्यातील संशोधकांनी केला आहे.

    पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या विषयची माहिती देण्यात आली. या सर्व इतिहासाची माहिती सर्वांना उपलब्ध व्हावी या उद्देशाने या शाखांचा समग्र इतिहास आणि पुढच्या पिढ्यांचे विवेंचन शिववंश या संशोधन ग्रंथाद्वारे प्रकाशित होणार आहे. न्यू ईरा पब्लिकेशन ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. या पुस्तकाचे लेखन करणसिंह बांदल यांनी केले आहे.



    बांदल यांच्या शिववंश या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अनवरण यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आले तेव्हा करणसिंह बांदल, सौरभ अमराळे, गणेश खुटवड, गोरखराव करांजवणे, बाळासाहेब अमराळे व शरद तांदळे उपस्थित होते.

    यावेळी बांदल यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी राजे यांचे दोन विवाह झाले. पहिला विवाह राजेशिर्के घराण्यातील येसुबाई यांच्या सोबत झाला. त्यांच्या पासून शिवाजी राजे उर्फ छत्रपती शाहू (थोरले) यांचा जन्म झाला. हे सर्वश्रूत आहे. त्यांचा दुसरा विवाह जाधवराव घराण्यातील दुर्गाबाई यांच्या सोबत 1675 साली झाला. तसेच हा विवाह स्वतः शिवाजी महाराज यांच्या समक्ष झाला होता. या विवाहातून चार अपत्ये जन्मास आली. त्यात दोन मुले व दोन मुली होत्या, त्यातील मुलांची नावे अनुक्रमे मदनसिंह आणि माधवसिंह अशी होती. मुलींच्या नावाबद्दल जास्त उल्लेख आढळून आला नाही.

    छत्रपती संभाजी राजे यांच्या मृत्यूनंतर रायगड किल्ल्याचा पडाव झाला व राजकबिला कैदेत सापडला. त्यामध्ये छत्रपती शाहू राजे (थोरले), मदनसिंह, माधवसिंह, सकवारबाई, येसूबाई व दुर्गाबाई यांचा समावेश असल्याचा संदर्भ मिळतो. पुढे 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज महाराष्ट्रात आले. त्यांनतर शाहूनी 1719 साली दिल्ली मोहीम आखली व राजकबिल्याची सुटका झाली. त्यामध्ये मदनसिंह होते. 1698 साली माधवसिंह यांचा मृत्यू झाला होता. मदनसिंह यांना दोन अपत्य झाली त्यांची नावे संभासिंह व रुपसिंह अशी होती, असे बांदल यांनी सांगितले. हा सर्व इतिहास बांदल यांनी शिववंश या पुस्तकातून मांडला आहे.

    Another dynasty of Chhatrapati Shivaji Maharaj was discovered

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य