• Download App
    भारताचे आकाश मिसाईल वाढवणार दुसर्‍या देशाचे सामर्थ्य; भारत वापरतो त्यापेक्षा वेगळ्या व्हर्जनच्या मिसाईल निर्यातीला केंद्राची मंजुरी | The Focus India

    भारताचे आकाश मिसाईल वाढवणार दुसर्‍या देशाचे सामर्थ्य; भारत वापरतो त्यापेक्षा वेगळ्या व्हर्जनच्या मिसाईल निर्यातीला केंद्राची मंजुरी

    • केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; आकाश मिसाईल निर्यात, ३ लाख रोजगार, इथेनॉल उत्पादन वाढविणार
    • भूतान आणि भारतामध्ये झालेल्या सहकार्य करारालाही मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. डीआरडीओने बनविलेल्या आकाश मिसाईच्या विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताचे आकाश मिसाईल दुसर्‍या देशाचे सामर्थ्य वाढविणार आहे. कारण भारत वापरतो त्यापेक्षा वेगळ्या व्हर्जनच्या मिसाईल निर्यातीला केंद्राची मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याचे ट्विट केले आहे. त्याच बरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची माहिती देताना सांगितले की, ७७२५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जवळपास तीन लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्य़ात आली आहे. Another country’s power will increase India’s akash missiles

    मंत्रिमंडळाने कृष्णपट्टनम आणि तुमकुरूच्या औद्योगिक वसाहतींमध्ये तसेच नोएडामध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक केंद्राला परवानगी दिली आहे. कृष्णपट्टनम बंदरामध्ये २१३९ कोटी रुपये खर्चून औद्योगिक क्षेत्राचा विकास केला जाणार आहे.

    जावडेकर यांनी सांगितले की, दोन ट्रेड कॉरिडॉर बनविण्यात येणार आहेत. यामुळे मालाची वाहतूक चांगल्या प्रकारे होईल. या कॉरिडॉरला एक्स्प्रेस वे, बंदरे आणि रेल्वेसारख्या सुविधा आहेत, त्या शहरांचाही विकास केला जाणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाने एस्टोनिया, पॅराग्वे आणइ डॉनिनिकन संघराज्यामध्ये भारतीय मिशन सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

    भूतान आणि भारतामध्ये झालेल्या सहकार्य करारालाही मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, इथेनॉलची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. देशाच्या पहिल्या पिढीच्या (1G) इथेनॉलच्या योजनेंतर्गत तांदूळ, गहू, मका, ऊस आदींपासून इथेनॉल बनविण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी केंद्राने ४५७३ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.

    Another country’s power will increase India’s akash missiles

    पारादीप पोर्टसाठी मोदी सरकारने ३००० कोटी रुपये दिले आहेत. याद्वारे जागतिक स्तरावरील बंदर उभारले जाणार आहे. याचबरोबर डीआरडीओने बनविलेल्या आकाश मिसाईच्या विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. ही मिसाईल भारतीय सैन्यामध्ये तैनात असणाऱ्या मिसाईलपेक्षा वेगळी असणार आहे. या आकाश मिसाईलची रेंज २५ किलोमीटर आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…