वृत्तसंस्था
मुंबई : सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याने आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्या. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा मुलगा जखमी झाला आहे. An angry father Bullets fired at two children In Mumbai ; Death of one
ऐरोली सेक्टर 2 मध्ये भगवान पाटील हे निवृत्त पोलिस अधिकारी राहत होते. शिघ्रकोपी असलेल्या भगवान पाटील यांच्या स्वभावाला कंटाळून त्यांची दोन्ही मुले वेगळी राहत होती. क्षुल्लक गोष्टींवरून भगवान पाटील बायको पोरांबरोबरही भांडण काढत होते.
गाडीचा विमा भरण्यासाठी मुलांनी वडील भगवान पाटील यांना सांगितले.त्यांनी मुलांशी हुज्जत घातली होती. संध्याकाळी दोन्ही मुलांना त्यांनी घरे बोलवले होते. घरात विम्यावरून तिघांमध्ये बालणे सुरु असताना पाटील यांना राग अनावर झाला.
मुलगा विजय आणि सुजय यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. स्वसंरक्षणासाठी असलेल्या रिव्हॉल्वरमधून भगवान पाटील यांनी पाच गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या विजय पाटीलच्या पोटात, खांद्यावर आणि हाताला लागल्या. तर दुसरा मुलगा सुजय पाटील याच्या अंगाला चिटकून गोळी निघून गेली.
विजय पाटील गंभीर जखमी झाला होता. त्याला त्वरीत ऐरोलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी भगवान पाटील याला पोलिसांनी अटक केली.
An angry father Bullets fired at two children In Mumbai ; Death of one
विशेष प्रतिनिधी
- दिग्विजय सिंह पाकिस्तानची भाषा बोलाहेत, सोनिया आणि राहूल गांधींनी द्यावे उत्तर, क्लब हाऊस चॅट लिक झाल्यावर संबित पात्रा यांचा आरोप
- पंजाबमधील राजकीय समीकरणे बदलणार, अकाली दल- बहुजन समाज पक्षाच्या युतीमुळे कॉँग्रेसच्या दलीत मतपेढीला लागणार सुरूंग
- औरंगजेबही आषाढी वारीची परंपरा बंद पाडू शकला नव्हता, ते पाप आघाडी सरकारने करू नये, भाजपाचे आवाहन