• Download App
    तृणमूलमधील भगदाड..: 'प्रशांत किशोर ज्या शाळेत शिकतात, त्याचे अमित शहा प्राचार्य'! | The Focus India

    तृणमूलमधील भगदाड..: ‘प्रशांत किशोर ज्या शाळेत शिकतात, त्याचे अमित शहा प्राचार्य’!

    ममता बॅनर्जी यांचे उत्तराधिकारी मानले जाणारे त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर प्रशांत किशोर यांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे प्रशांत किशोर प्रचंड ताकदवान बनले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : प्रशांत किशोर ज्या शाळेत शिकतात त्याचे अमित शहा प्राचार्य आहेत, असे भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने म्हटले होते. तृणमूल कॉँग्रेसमध्ये सुर असलेल्या गळतीमुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ममता बॅनर्जींकडून प्रचंड महत्व आलेल्या प्रशांत किशोर यांनी तृणमूलच्या नेत्यांना अडगळीत टाकायला सुरूवात केली होती. त्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

    ‘Amit Shah is the principal of the school where Prashant Kishor studies’!

    ममता बॅनर्जी यांचे उत्तराधिकारी मानले जाणारे त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर प्रशांत किशोर यांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे प्रशांत किशोर प्रचंड ताकदवान बनले आहेत. पक्षातील इतर कोणालाही ते जुमानत नाही. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर नेते पक्ष सोडत असल्याचे दिसून येत आहे.

    आत्तापर्यंत एक खासदार, सात आमदार यांच्यासह सुमारे डझनभर तृणमूलच्या नेत्यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. ही रांग येथेच थांबणार नाही, असेही दिसत आहे. जून २०१९ मध्ये ममता बॅनर्जी यांच्याबरोबर प्रशांत किशोर यांची पहिली भेट झाली होती. रणनितीकार म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांचा बंगालच्या राजकारणावर काय परिणाम होणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणिस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय म्हणाले होते की, प्रशांत किशोर ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचे अमित शहा प्राचार्य आहेत. विजयवर्गीय यांचे हे बोल खरे ठरू लागले आहेत. शहा यांनी ज्या पध्दतीने ममतांच्या बालेकिल्याला खिंडार पाडले आहे ते पाहता प्रशांत किशोरही ते सांधण्यास यशस्वी ठरणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.

    प्रशांत किशोर यांची आजपर्यंतची कारकिर्द पाहिली तर दिसून येते की पक्षाचे प्रमुख त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतात. त्यांना सर्व अधिकार देतात. मात्र, त्यांच्या कार्यपध्दतीमुळे पक्षातील दुसºया आणि तिसºया फळीतील नेत्यांना कस्पटासमान लेखायला लागतात.

    त्यामुळे नाराज झालेले हे नेते दुसरीकडे आसरा शोधायला लागल्यावर काय करायचे असा प्रश्न प्रमुखाला पडतो. प्रशांत किशोर यांच्यापासून सुटका कशी करून घ्यायची या कोंडीत आता ममता बॅनजीर्ही सापडल्या आहेत. एकेकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबतही हेच घडले होते. नितीश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानात प्रशांत किशोर यांचे वेगळे कार्यालय होते. नितीश कुमार यांनी त्यांना पक्षात दुसºया क्रमांकाचे स्थान दिले होते. परंतु, पंधरा महिन्यांतच नितीश कुमार यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले. याचे तत्कालिन कारण नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मतभेद असलेल तरी खरे कारण पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांशी प्रशांत किशोर यांचे पटत नव्हते हेच होते. त्यामुळे नितीश कुमार यांच्यासारख्या जुन्याजाणत्या राजकारण्याने त्यांना वेळीच बाजूला केले.

    कॉँग्रेसनेही उत्तर प्रदेशात पुन्हा आपले स्थान बनविण्यासाठी प्रशांत किशोर यांना निमंत्रित केले होते. गांधी परिवाराचे ते खास बनले. परंतु, त्यानंतरही कॉँग्रेसची उत्तर प्रदेशात काय अवस्था झाली हे सगळ्यांनीच पाहिले. त्यांनी २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी- कॉँग्रेसची युती घडविण्यात महत्वाची भूमिका बजावल. उमेदवार निवडीमध्येही त्यांचा मोठा सहभाग होता. परंतु, या दोन्ही पक्षांचे निवडणुकीत पानिपत झाले.

    ‘Amit Shah is the principal of the school where Prashant Kishor studies’!

    ममता कोंडीत…
    प्रशांत किशोर यांची आजपर्यंतची कारकिर्द पाहिली तर दिसून येते की पक्षाचे प्रमुख त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतात. त्यांना सर्व अधिकार देतात. मात्र, त्यांच्या कार्यपध्दतीमुळे पक्षातील दुसºया आणि तिसºया फळीतील नेत्यांना कस्पटासमान लेखायला लागतात. त्यामुळे नाराज झालेले हे नेते दुसरीकडे आसरा शोधायला लागल्यावर काय करायचे असा प्रश्न प्रमुखाला पडतो. प्रशांत किशोर यांच्यापासून सुटका कशी करून घ्यायची या कोंडीत आता ममता बॅनजीर्ही सापडल्या आहेत. एकेकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबतही हेच घडले होते.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??