प्रशासनात राजकारण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाचाराला संस्थात्मक संरक्षण हे तीन अत्यंत घातक पायंडे पश्चिम बंगालने भारतीय राजकारणात आणले असल्याचा आरोप केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केला आहे. तृणमुल कॉंग्रेस केवळ एका घराण्याचा पक्ष झाला असून एकेकाळी अनेक गोष्टींत प्रथम क्रमांकावर असलेला बंगाल गेल्या दहा वर्षांत २० व्या स्थानावर गेला असल्याचेही त्यांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : प्रशासनात राजकारण,राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाचाराला संस्थात्मक संरक्षण हे तीन अत्यंत घातक पायंडे पश्चिम बंगालने भारतीय राजकारणात आणले असल्याचा आरोप केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केला आहे. तृणमूल कॉंग्रेस केवळ एका घराण्याचा पक्ष झाला असून एकेकाळी अनेक गोष्टींत प्रथम क्रमांकावर असलेला बंगाल गेल्या दहा वर्षांत २० व्या स्थानावर गेला असल्याचेही त्यांनी सांगितले.
Amit Shah accuses Mamata Banerjee of corruption, politics in west bengal
पश्चिम बंगालमधील दोन दिवसांचा दौरा केल्यानंतर शहा म्हणाले की, बंगालने राजकारणात आणलेले घातक पायंडे लोकशाहीसाठी आणि राज्यातील जनतेसाठी धोक्याची घंटा आहेत. त्यामुळेच लोकांनी आता बदल घडविण्यासाठी भारतीय जनता पक्षासोबत यायला हवे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल कॉंग्रेस गेल्या दहा वर्षांत केलेली कामे सांगत आहे. मात्र, याची पोलखोल करताना शहा म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत अनेक आघाड्यांवर पश्चिम बंगालची घसरण सुरू आहे. पूर्वी अनेक आघाड्यांवर पश्चिम बंगाल देशात प्रथम क्रमांकावर होते. मात्र, आता २० व्या स्थानी आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा, औद्येगिक उत्पादन सगळेच घसरले आहे.
एकेकाळी देशातील औद्योगिक उत्पादनात पश्चिम बंगालचा वाटा ३० टक्के होता. तो आता साडेतीन टक्यांवर आला असल्याचे शहा यांनी सांगितले. ते म्हणाले की, १९६० च्या दशकात महाराष्ट्रापेक्षा पश्चिम बंगालचे दरडोई उत्पन्न दुप्पट होते. आता ते महाराष्ट्राच्या निम्मे आहे. १९५० मध्ये बंगालमध्ये देशातील ७० टक्के फार्मास्युटिकल उत्पादने बनत होती. आता सात टक्केही बनत नाहीत. आता पश्चिम बंगाल भ्रष्टाचार, परिवारवाद, हिंसाचार, बॉंबस्फोट आणि विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
ममता बॅनर्जी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मात्र, त्यांच्याइतका शेतकरी विरोधी कोणी नाही असे सांगून अमित शहा म्हणाले, पश्चिम बंगालमधील एकाही शेतकऱ्याला केंद्राच्या शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळाला नाही. याचे कारण ममता सरकारने शेतकऱ्यांची यादीच पाठविली नाही. राज्यातील किमान २३ लाख शेतकऱ्यांना केंद्राकडून दरवर्षी मिळणाऱ्या सहा हजार रुपये मदतीसाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. ममता बॅनर्जी यांना केवळ त्या अर्जांना प्रमाणित करायचे होते. पण त्यांनी हे देखील केले नाही. भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र पाठवितेय असे समजून त्यांनी सही केली असती तरी लाखो शेतकऱ्यांचा फायदा झाला असता.
Amit Shah accuses Mamata Banerjee of corruption, politics in west bengal
शहा म्हणाले की, मॉं, माटी आणि मानुष हे तृणमूल कॉंग्रेसचे घोषवाक्य आता भ्रष्टाचार, परिवारवाद आणि लांगूलचालन हे बनले आहे. हे झाले त्याचे कारण म्हणजे ममता बॅनर्जी राज्यातील १० कोटी जनतेचा विचार करत नाहीत. त्यांच्या डोक्यात एकच विचार घोळत असतो तो म्हणजे आपल्या भाच्याला मुख्यमंत्री कसे बनवायचे.