- अक्षय कुमारने ट्वीट करून दिली माहिती : मुंबईतील रुग्णालयात सुरू होते उपचार
विशेष प्रतिनिधी
मुंबई:बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं आज निधन झालं. त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारने ट्वीट करून ही माहिती दिली.Akshay Kumar’s mother Aruna Bhatia dies; Akshay’s passionate post
अरुणा भाटिया मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. दरम्यान, प्रकृती आणखी बिघडल्यानं त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 3 सप्टेंबरपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आईची प्रकृती बिघडल्याने अक्षय कुमारनेही शुटिंग अर्ध्यावर सोडलं होतं.
दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. अक्षय कुमारने ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली. आईच्या निधनानंतर अक्षय कुमार भावूक झाला असून, त्याने सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
‘ती माझा अविभाज्य भाग होती. आज मला असह्य वेदना होत आहेत. माझा आई श्रीमती अरुणा भाटिया यांचं आज सकाळी हे जग सोडून गेली आहे. ती दुसऱ्या जगात पुन्हा एकदा माझ्या वडिलांकडे गेली आहे. मी आणि माझं कुटुंब कठीण काळातून जात असून, आपल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती’, असं अक्षय कुमारने ट्वीट करून म्हटलं आहे.