चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या मुद्द्यावर मुनगंटीवार यांनी सरकारला प्रश्न विचारला .
दारूबंदी उठविण्याचा निर्णय अन्यायकारक असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. चंद्रपूरमधील दारुबंदी ही भाजप शिवसेना सरकार सत्तेवर असताना करण्यात आली होती .मात्र ठाकरे-पवार सरकारच्या काळात ती उठवण्यात आली .त्यानंतर चंद्रपूरमध्ये तुफान दारूविक्री झाली .यावर मुनगंटीवार यांनी सरकारला प्रश्न विचारला .यालाच उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजब उत्तर दिले उपमुख्यमंत्री म्हणाले दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यानं दारुबंदी उठवण्यात आली.Ajit Pawar’s strange answer to Mungantiwar’s question …
युती सरकारच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने ही दारुबंदी उठवली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या मुद्द्यावर बोलताना आज सभागृहात अजित पवार म्हणाले की, मुनगंटीवार तुम्ही दारुबंदी केली. पण तिथल्या लोकांच्या मागणीमुळे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यानं दारुबंदी उठवण्यात आली.
महिलांची आंदोलने, देवतळे समितीच्या शिफारशी व जनआंदोलनाचा रोष यामुळे चंद्रपूर जिल्हा दारूबंदी करण्याचा निर्णय 2015 साली घेण्यात आला.
मविआ सत्तेत आल्यावर काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री विजय वडे्डटीवार यांनी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी पुढाकार घेतला होता.
विक्रमी दारू विक्री –
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटवल्यानंतर 6 महिन्यात 94 लाख 34 हजार 42 लिटर दारूची विक्री झाली आहे.
विक्री झालेल्या दारूचा आकडा राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार दिवसांपूर्वी जाहीर केलाय.
निर्णय स्थगित करण्यासाठी न्यायालयात याचिका
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांचा याचिकाकर्त्यांत समावेश आहे.
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या दारू बंदी उठविण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळावी आणि महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या व्यसनमुक्ती धोरण 2011 ची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, यांसह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील अनेक बाबी अधोरेखित करत ही याचिका दाखल केली आहे.
दारूबंदी उठविण्याचा निर्णय अन्यायकारक असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल