मोबाईल टॉवर्स उद्ध्वस्त करू नकात त्यामुळे इंटरनेट व दूरध्वनी सेवा विस्कळीत होऊ लागली आहे. माझे आवाहन तुम्ही ऐकत नाहीत जर आता तुम्ही ही कॄती थांबविली नाही तर पोलिस कठोर कारवाई करतील.
विशेष प्रतिनिधी
चंदिगड : वारंवार केलेल्या आवाहनानंतरही शेतकरी आंदोलन जुमानत नसल्याने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे चांगलेच संतापले आहेत. After the protesting farmers demolished 1400 mobile towers, Captain Amarinder Singh got angry
मोबाईल टॉवर्स उद्ध्वस्त करू नकात त्यामुळे इंटरनेट व दूरध्वनी सेवा विस्कळीत होऊ लागली आहे. माझे आवाहन तुम्ही ऐकत नाहीत जर आता तुम्ही ही कॄती थांबविली नाही तर पोलिस कठोर कारवाई करतील, असे अमरिंदर सिंग यांनी शेतकरी आंदोलकांना सुनावले आहे.
शेतकरी आंदोलनाचा एक भाग म्हणून जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरला आंदोलकांनी लक्ष केले आहे. आत्तापर्यंत चौदाशेहून अधिक टॉवर्स उद्ध्वस्त केले आहेत. टॉवर्सची नासधूस नको, हे अमरिंदर सिंग यांचे आवाहन शेतकऱ्यांनी धुडकावून लावले आहे. त्यामुळे आता त्यांनी शेतकऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
After the protesting farmers demolished 1400 mobile towers, Captain Amarinder Singh got angry
तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत चालू असलेल्या पंजाबी शेतकर्यांच्या आंदोलनाला प्रारंभिक फूस अमरिंदर सिंग यांची होती, असे बोलले जाते. मात्र हे आंदोलन आता अमरिंदर सिंग यांच्या हाताबाहेर गेल्याचे निरीक्षण राजकीय वर्तुळात आहे.