विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरकारने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करून १५ ऑगस्टपासून मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र,कोरोना लसीचे २ डोस बंधनकारक केले होते. या अटीमुळे दोन दिवसात ग्राहकच मॉलमध्ये फिरकले नाहीत. After Mumbai in Kalyan malls are also closed;
मूळातच पंचेचाळीस वर्षाखालील नागरिकांच्या लसीकरणाला मे-जूनमध्ये सुरुवात झाली. त्यांचा दुसरा डोस इतक्या लवकर येणे कसे शक्य आहे,असा सवाल देखील त्यांनी उपस्थित होतोय. लसीकरणाचा वेग पाहता सध्या तरी दोन डोसची अट पाळून मॉल सुरू ठेवण अशक्य आहे त्यामुळे हताश होऊन मॉल बंद ठेवण्यात आले आहेत.
सरकारने ही अट शिथिल करून काहीतरी पर्याय द्यावा, अशी मागणी मॉल मालकांनी केली आहे.
- मुंबईसह कल्याणचे मॉल चालकांनी केले बंद
- लसीचे दोन डोस अद्यापही अनेकांनी घेतलेले नाहीत
- अनेक ग्राहकांनी फिरवली मॉलकडे पाठ
- मॉल चालकांची चिंता वाढली, आर्थिक फटका
- लसीची अट शिथिल करून पर्याय देण्याची मागणी