• Download App
    Afghanistan : दोन वाघिणी - ज्या तालिबानशी लढल्या ! जाणून घ्या कोण आहेत या दोन जांबाज महिला अधिकारी Afghanistan: Two tigress - who fought against the Taliban! Find out who these two brave female officers are Salima Mazari

    Afghanistan : दोन वाघिणी – ज्या तालिबानशी लढल्या ! जाणून घ्या कोण आहेत या दोन जांबाज महिला अधिकारी

    विशेष प्रतिनिधी

    काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून निघून गेले आहेत. मात्र अशा परिस्थितित देखील तालिबानशी लढणाऱ्या दोन वाघिणी आहेत . होय अफगाणिस्तानमधल्या दोन महिला अधिकारी ज्यांनी तालिबानशी वाघिणीप्रमाणे झुंज दिली.Afghanistan: Two tigress – who fought against the Taliban! Find out who these two brave female officers are

    सलीमा मझारी यांच्या जिद्दीला सलाम –
    अफगाणिस्तानातील महिला राज्यपालांपैकी एक आहेत. अफगाणिस्तानमधल्या अनेक प्रांतांनी तालिबानसमोर शरणागती पत्करली. मात्र चाहर किंट हा आपला प्रांत सोडून सलीमा मझारी पळून गेल्या नाहीत. बाल्ख प्रांताच्या शरणागतीपर्यंत त्या लढत राहिल्या. तालिबानचा सामना करण्यासाठी त्यांनी हातात शस्त्र उचललं.

    तालिबान्यांविरोधात चाहर किंट जिल्ह्याने आणि बाल्ख प्रांताने बराच काळ लढा दिला. चाहर किंट हा अफगाणिस्तानात असलेल्या बाल्ख प्रांतातील जिल्हा आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या 32 हजार 306 इतकी आहे. चाहर किंटमधे लढा देताना सलीमा मझारी यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं.

    तालिबानने पूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवेपर्यंत चाहर किंट हा एकमेव प्रदेश होता ज्याचं नेतृत्व एक महिला करत होती.


    कोण आहेत सलीमा मझारी?

    सलीमा मझारी यांचा जन्म इराणमध्ये झाला. अफगाणिस्तानमधे असलेलं त्यांचं कुटुंब सोव्हिएत युद्धाच्या वेळी पळून गेलं होतं. तेहरानच्या विद्यापीठातून सलीमा मझारी यांनी पदवी घेतली. अफगाणिस्तानमध्ये परतण्यापूर्वी मझारी यांनी आंतरराष्ट्रीय स्थलांतर संस्थेतही काम केलं आहे. चाहर किंट ही सलीमा मझारी यांची वडिलोपार्जित जन्मभूमी आहे. 2018 मध्ये त्यांनी गव्हर्नर पदासाठी अर्ज केला होता आणि त्यांना यश मिळालं.

    सलीमा मझारी यांनी तालिबानशी लढा देण्यासाठी लष्करी टीम तयार केली होती. कारण तालिबान्यांनी एकानंतर एक जिल्हा ताब्यात घेण्यास सुरूवात केली. यापूर्वी अनेक जीवघेण्या हल्ल्यातून त्या वाचल्या आहेत.

    झरीफा गफरी

    15 ऑगस्टला जरीफा गफारीने सूर्योदयाचं एक चित्र ट्विट केलं होतं. ट्विटरवर तिच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, माझ्या प्रिय मातृभूमी मला माहित आहे की तू दुःखात आहेस आणि खूप जास्त दुःखात आहेत. मला माहित आहे तुझ्यासाठी हे सगळं कठीण आहे. अनोळखी लोक इथे जाळपोळ करतात, हिंसा करतात. तुझी मुलं तुला घडवू पाहात आहेत.. अत्यंत साहसाने तुला (मातृभूमीला) या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एक टाळता न येण्यासारखी गोष्ट घडली आहे ती म्हणजे तालिबानने काबूल आणि अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे.

    जरीफा गफारी या अवघ्या 29 वर्षांच्या आहेत. अफगाणिस्तानमधल्या त्या सर्वात तरूण आणि पहिल्या महापौर आहेत. त्या महापौर झाल्या तेव्हा त्यांचं वय 26 वर्षे होतं . तालिबानला अशा धडाडीच्या महिला कधीही पटत नाहीत त्यामुळे तालिबानने त्यांना लक्ष्य केलं. त्यांच्या हत्येचा कट रचला पण यातून त्या बचावल्या. 2020 मध्ये त्यांच्या वडिलांची हत्या झाली.

    तीन आठवड्यांपूर्वी जरीफा यांनी आपल्याला वाटणारी भीती आणि अफगाणिस्तानच्या युवकांवर असलेला विश्वास याबाबत भाष्य केलं. जरीफा यांनी काबूलमध्येच राहण्याचा आणि संघर्ष करण्याचा निर्णय घेतला.

    तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी महिला आणि विरोधकांना संरक्षण दिलं जाईल असं म्हटलं आहे. ज्यांनी अफगाणिस्तान सरकार आणि परदेशी सैन्यासाठी काम केलं त्यांनाही आम्ही हानी पोहचवणार नाही असं म्हटलं होतं. असं असलं तरीही तालिबानी हे त्यांच्या सूडासाठी आणि महिलांवरच्या अत्याचारांसाठी कुप्रसिद्ध आहेत.

    मार्च 2020 मध्ये जरीफा यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने त्यांच्या धाडसासाठी सन्मानितही केलं होतं. माझ्या पिढीतल्या महिला तालिबानचे राज्य विसरलेलल्या नाहीत. भविष्यासाठी त्या कायमच चिंतेत आहोत असं त्यांनी म्हटलं होतं.

    Afghanistan: Two tigress – who fought against the Taliban! Find out who these two brave female officers are-Salima Mazari-Zarifa Gafari

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने