Tuesday, 6 May 2025
  • Download App
    तिरंगा यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन ,आपच्या १७ नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल AAP breaks rules in UP, 17 leaders booked

    तिरंगा यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन ,आपच्या १७ नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी

    आग्रा – तिरंगा यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या १७ नेत्यांसह ५०० अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह यांचाही यात समावेश आहे. AAP breaks rules in UP, 17 leaders booked

    उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत अयोध्या, लखनौत तिरंगा यात्रा काढण्याचे आपचे नियोजन आहे. अयोध्येसह उत्तर प्रदेशातील ४०३ विधानसभा मतदारसंघात यात्रा काढण्याची घोषणा सिसोदिया यांनी केली आहे.



    आपने रविवारी आग्र्यातील जीआयसी मैदान ते शहीद स्मारकदरम्यान यात्रा काढली होती. त्यात सिसोदिया, सिंह यांच्यासह आपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. पोलिसांनी कोरोनामुळे केवळ ५० जणांच्या उपस्थितीत यात्रा काढण्याची परवानगी दिली होती. मात्र, यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्यांनी या नियमाचे उल्लंघन केले. या सर्वजणांविरुद्ध भादंविच्या संबंधित कलमांसह साथरोग कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

    AAP breaks rules in UP, 17 leaders booked

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??