मानवी शरीराची रचना खूप किचकट आहेच त्याशिवाय थक्क करणारी अशीच आहे. शरीरातील सर्व अवयवांचे विषेष स्थान व महत्व आहे. त्यामुळे त्यांचे चलनवलन करण्यासाठी हजारो पेशी शरीरात आहेत. या पेशींच्या मदतीने मानवाचे शरीर कार्य करीत असते. आपल्या शरीरात असलेल्या एकूण पेशींपैकी सर्वाधिक संख्या ही रक्तपेशींचीच असते.a total of 60,000 cells in the human body, half of which are blood cells
शरीरात एकूण साठ हजार पेशी असल्याचे मानले जाते. त्यापैकी निम्म्या म्हणजे तीस हजार पेशी या रक्तपेशी असतात. तेव्हा रक्ताचे शरीरातील महत्व अनन्यसाधारण असेच आहे. त्याचबरोबर शरीराच्या कानाकोपऱ्यात संचार करीत रक्त प्रत्येक पेशीला आवश्यक असणाऱ्या पेशींची व पोषणाची तरतूद करीत असते. हवेतून शोषून घेतलेला आक्सीजन फुफ्फुसाकडून मिळवित तो सर्व पेशींना रक्त बहाल करते. असे असले तरी माणसाच्या शरीरात नेमके किती रक्त आहे हे नेमकेपणाने आतापर्यंत कोणी सांगू शकलेले नाही.
ह्ददयाच्या कोणत्याही एका ठोक्यात बाहेर फेकल्या जाणाऱ्या रक्ताच्या आकारमानावरुन एकूण रक्ताचा अंदाज बांधला गेला आहे. त्यानुसार साधारण सत्तर किलो वजन असलेल्या प्रौढ व्यक्तीच्या शरीरात 5.2 ते 5.6 लिटर रक्त असते. तर 50 किलो वजनाच्या स्त्रीच्या शरीरात साडेतीन लिटर रक्त असते. याचाच अर्थ वय, वजन यावर शरीरातील एकूण रक्तसाठा अवलंबून असतो. त्यामुळेच रक्ताला शरीरात अनन्यासाधारण महत्व असते.
किरकोळ जखम झाली तर थोडे रक्त वाहते. ते रक्त भरुन काढण्याची क्षमता शरीरात असते. मात्र जर मोठा अपघात झाला तर जास्त प्रमाणात रक्त वाहून जाते. अशा वेळी संबंधित व्यक्तीला बाहेरुन रक्तपुरवठा करणे आवश्यक ठरते. त्यामुळेच शरीररात जर रक्त कमी असेल तर त्याचा परिणाम एकूण शरीरस्वास्थावर होतो. त्या व्यक्तीची शाररिक क्रीया मंदावतात, ताकद कमी पडते. तसेच त्याला उर्जा अपुरी पडू लागते. त्यामुळे सकस अन्न, पालेभाज्या, ताजी फळे, दूध, तूप यांचा आहारात समावेश करणे क्रमप्राप्त ठरते.
a of 60,000 cells in the human body, half of which are blood cells