• Download App
    तिसऱ्या आघाडीची हूल उठवून शरद पवार यांची राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी?, प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठकांची मालिका A series of meetings with Prashant Kishor, Sharad Pawar to form a third front or for the post of President?

    तिसऱ्या आघाडीची हूल उठवून शरद पवार यांची राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी?, प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठकांची मालिका

    देशात तिसरी आघाडी तयार करण्याची हूल उठवून राष्ट्र वादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यासाठी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यसोबत त्यांच्या बैठकांची मालिका सुरू झाली आहे. A series of meetings with Prashant Kishor, Sharad Pawar to form a third front or for the post of President?


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: देशात तिसरी आघाडी तयार करण्याची हूल उठवून राष्ट्र वादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यासाठी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यसोबत त्यांच्या बैठकांची मालिका सुरू झाली आहे.

    निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी शरद पवार यांची गेल्या ३ दिवसांतील ही दुसरी भेट आहे. काँग्रेस , भाजपेतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवारांकडून सुरू आहे का, अशी चर्चा सुरू झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे पवार राष्ट्रपती पदासाठी मोचेर्बांधणी करत आहेत का, अशीही चर्चा राजकीय वतुर्ळात रंगू लागली. आम्हाला संख्याबळाची कल्पना आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठीची उमेदवारी हा काही विषय नाही, असे पवारांनी सांगितले असले तरी ही शक्यता नाकारता येत नाही.



    विरोधकांच्या बैठकीआधी शरद पवारांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर पवार विरोधी पक्षातील नेत्यांना भेटले. या बैठकीत तिसºया आघाडीबद्दल चर्चा न झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी दिली. याशिवाय राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीतही रस नसल्याचं पवारांनी सांगितलं. यानंतर आता प्रशांत किशोर पुन्हा एकदा पवारांच्या भेटीला गेले आहेत. गेल्या १५ दिवसांमधील ही तिसरी भेट आहे. याआधी मुंबईत ११ जूनला पवार आणि किशोर यांची बैठक झाली होती. त्यानंतर २१ जूनला पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पवार आणि किशोर यांच्यात जवळपास साडेतीन तास चर्चा झाली.

    कॉँग्रेसला वगळून तिसरी आघाडी करणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. शरद पवार यांचे नेतृत्व कॉँग्रेस मानणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे तिसºया आघाडीची हूल उठवून राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी शरद पवार करत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे. केवळ विरोधकांचेच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचेही उमेदवार होण्याचा पवारांचा प्रयत्न असू शकतो.

    A series of meetings with Prashant Kishor, Sharad Pawar to form a third front or for the post of President?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kolkata : कोलकाताच्या हॉटेलमध्ये आग, 14 जणांचा मृत्यू, 22 जणांची सुटका, बचावकार्य सुरू

    PAK Army : पाकिस्तानच्या उलट्या बोंबा- भारत दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप; PAK लष्कराने चॅटचे स्क्रीनशॉट दाखवले

    Visakhapatnam : विशाखापट्टणमच्या नृसिंह स्वामी मंदिराची भिंत कोसळून 8 ठार, 4 जखमी; मुसळधार पावसामुळे दुर्घटना