- सातव्या वर्धापन दिनानिमित्त माहिती देताना भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, कोरोना साथीच्या निमित्ताने यावेळी पक्षाकडून कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. सर्व भाजप शासित राज्यांमध्ये पक्ष ‘त्या’ मुलांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवित आहे.7 sal Bemisal! BJP to mark 7 years of Modi govt on May 30 with new scheme for kids orphaned due to COVID
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ७ वर्ष…७साल बेमिसाल! ३० मे रोजी केंद्र सरकारचा सातवा वर्धापन दिन आहे. या वेळी भारतीय जनता पार्टी कोणताही कार्यक्रम आयोजित करणार नाही. सातव्या वर्धापन दिनानिमित्त माहिती देताना भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात यावेळी पक्षाकडून कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. भाजपा शासित सर्वच राज्यात, कोरोनामुळे पालक गमावलेल्या आणि अनाथ झालेल्या मुलांसाठी पक्ष मोठ्या प्रमाणात योजना राबवित आहे. 7 sal Bemisal! BJP to mark 7 years of Modi govt on May 30 with new scheme for kids orphaned due to COVID
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपचे सरकार असलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. जेपी नड्डा यांनी भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की 30 जूनला केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारची सात वर्षे पूर्ण झाल्यावर कोणताही कार्यक्रम साजरा करू नका व आयोजन करू नका.
या संदर्भात सर्व भाजप शासित राज्यांना केंद्र सरकारकडून यापूर्वी निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह इतर भाजप शासित राज्यांनी पावले उचलली आहेत. कोरोना कालावधीत अनाथ झालेल्या मुलांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करावी किंवा ज्यांचे पालक दोघेही रुग्णालयात आहेत अशा मुलांची काळजी घ्यावी, अशी सुचना केंद्र सरकारने भाजप शासित राज्यांना केली आहे. त्याचबरोबर, या संदर्भातील संपूर्ण तपशीलवार धोरण पुढील आठवड्यात म्हणजेच ३० मे रोजी उत्तर प्रदेशसह अन्य भाजपा शासित राज्यांच्या सरकारकडून सार्वजनिक केली जाईल.