वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकार देशभर मेगा इव्हेंट करणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारची उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असून नेताजींच्या 125 व्या जयंतीचे 23 जानेवारीपासून विविध कार्यक्रमांची रूपरेखा आणि आयोजन ही समिती करणार आहे. या निमित्ताने त्यांचे ग्रंथ पुन्हा छापण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. 125th Birth Anniversary of Netaji Subhas Chandra Bose.
तसेच विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप सुरू करण्याचा देखील विचार करत आहे आयएनएच्या योद्धांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. 125th Birth Anniversary of Netaji Subhas Chandra Bose.
सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे प्रस्ताव आले होते. उच्चाधिकार समिती त्याला मान्यता देणार आहे. बोस कुटुंबातील सदस्य, नेताजी सुभाषचंद्र बोस आयएनए ट्रस्ट, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार आणि नेताजीशी संबंधित विविध संघटनांचे प्रतिनिधी यांचाही या समितीत सहभाग असणार आहे.
125th Birth Anniversary of Netaji Subhas Chandra Bose.
या संदर्भात सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल म्हणाले की, बोस कुटुंबीय आणि आयएनएच्या सदस्यांकडे मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक कागदपत्रे, क्लिपिंग्ज, छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर साहित्य आहेत, ते एका ठिकाणी आले पाहिजेत. कोलकाता येथे सुभाषबाबूंच्या बोस नावाने एक विस्तीर्ण संग्रहालय बांधण्याचा प्रस्तावही ठेवला आहे.