• Download App
    सोनिया गांधींचे विधान निंदनीय : नड्डा | The Focus India

    सोनिया गांधींचे विधान निंदनीय : नड्डा

    विशेष  प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाशी १३० कोटी जनता लढत असताना कॉग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे लॉकडाऊन तयारीशिवाय करण्यात आलेले विधान निंदनीय आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रात्री केली. पंजाब, राजस्थान या सारख्या सहा राज्यांमध्ये आधीच लॉकडाऊन केले होते. तेथे काँग्रेस सरकारे आहेत. तेथे तयारी शिवाय लॉकडाऊन करण्यात आले, असे सोनिया गांधींचे मत आहे का? असा सवाल नड्डा यांनी उपस्थित केला. WHO ने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विविध उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. अन्य देशांना भारताचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवत सर्व देशांमध्ये गरीबांसाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. अशा स्थितीत सोनिया गांधींचे लॉकडाऊन वरील विधान काँग्रेसच्या संकुचित राजकारणाची मनोवृत्तीच सांगते. आपण अशा प्रकारच्या संकुचित राजकारणापासून दूर राहात कोरोना विरोधात लढाई एकजुटीने केली पाहिजे, असे आवाहन नड्डा यांनी केले.

    Related posts

    भाजप मधल्या टॅलेंटची सुप्रिया सुळेंना “चिंता”; पण खुद्द त्यांच्या टॅलेंटचा त्यांच्याच पक्षाला का उपयोग होईना??

    शरद पवारांच्या घरातल्याच दोघांची परस्पर विरोधी वक्तव्ये; जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीतल्या गोंधळात भर!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून पुणे + पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजपशीच लढायची अजितदादांवर वेळ??