• Download App
    सेक्युलर मॉब लिंचिंगवर बुद्धिमंतांच्या जीभा कोरड्या पडल्या...!!; अर्णव गोस्वामीने एडिटर्स गिल्ड सोडले | The Focus India

    सेक्युलर मॉब लिंचिंगवर बुद्धिमंतांच्या जीभा कोरड्या पडल्या…!!; अर्णव गोस्वामीने एडिटर्स गिल्ड सोडले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पालघर जिल्ह्यात दोन साधूंच्या सेक्युलर मॉब लिंचिंगवरून देशा परदेशातील बुद्धिमंतांच्या जीभा कोरड्या पडल्या आहेत. छोट्या मोठ्या कारणांवरून अविष्कार स्वातंत्र्याचा गळा काढणाऱ्या एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाही आपले शहामृगी तोंड वाळूत खूपसून बसला आहे. या गिल्डमधून रिपब्लिक भारतचा प्रमुख संपादक अर्णव गोस्वामी राजीनामा देऊन बाहेर पडला आहे. पण बाहेर पडताना त्याने गिल्डचे सध्याचे प्रमुख शेखर गुप्ता यांचा बुरखा फाडला आहे. सेक्युलर मॉब लिंचिंगवर गुप्ता कसे मूग गिळून गप्प आहेत, याची कहाणीत अर्णवने खणखणीत शब्दांत ऐकवली.

    देशात मोदी सरकार आल्यापासून असहिष्णुतेचे वातावरण आहे, असा धोशा लावणाऱ्या लिबरल्सचाही दांभिकपणा त्याने उघड केला.
    महंमद अखलाखच्या मॉब लिंचिंगवरून या लिबरल गँगने मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. अशाच प्रकरणांचा बागूलबुवा उभा करून अँवॉर्ड वापसीचे नाटक रंगवले होते. अमिर खान, स्वरा भास्कर, जावेद अख्तर, अरुंधती रॉय यांना हा देश असुरक्षित वाटत होता. ते सगळे आज साधूंच्या मॉब लिंचिंगवरून गप्प बसले आहेत. तोंडातून चकार शब्द काढत नाहीत. या सगळ्यांच्या सेक्युलर, लिबरल विचारसरणीवर अर्णवने प्रश्नचिन्ह लावले आहे.

    पालघर जिल्ह्याती मॉब लिंचिंगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीचे झेडपी सदस्य गुंतल्याची नावे आली आहेत. वर उल्लेख केलेले तथाकथित लिबरल्स त्यांचा पाठिशी मूकपणे उभे आहेत.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…