• Download App
    शेजारील राष्ट्रांना मदत करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन | The Focus India

    शेजारील राष्ट्रांना मदत करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन

    चीनी व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे व मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जगन्नाथ यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थिती जाणून घेतली. या दोन्ही राष्ट्रांना मदतीचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : चीनी व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे व मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जगन्नाथ यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थिती जाणून घेतली. या दोन्ही राष्ट्रांना मदतीचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

    पंतप्रधान याविषयी माहिती देताना म्हणाले,गोताबाया व जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखाली त्या-त्या देशांनी चीनी व्हायरसचा निकराने प्रतिकार केला आहे व आपापल्या देशांतील स्थिती नियंत्रणात ठेवली आहे.

    समुद्रमार्गे जोडल्या गेलेल्या या शेजारी देशांत उद्भवणाऱ्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत निश्चितच मदत करेल. श्रीलंका, मॉरिशस व आपली संस्कृती एकसारखीच आहे,त्यामुळे त्यांच्यात व आपल्यात सुरुवातीपासून चांगले संबंध आहेत. या कठीण काळात या दोन्ही देशांच्या आपण पाठिशी उभे आहोत.

    चीनी व्हायरस पश्चात काळात श्रीलंकेत भारताच्या मदतीने आणखी विकास प्रकल्प हाती घेण्यात येतील असे राजपक्षे व जगन्नाथ यांनी मान्य केल्याची माहितीही मोदी यांनी दिली

    Related posts

    प्रशांत किशोर संदर्भात बातमी आल्यानंतर लगेच पार्थ पवारांचा खुलासा; पण राष्ट्रवादीतल्या राजकीय गदारोळाबद्दल मात्र मौन!!

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!