• Download App
    भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिकायला यावे; स्वागतच आहे ; महामारीतून लवकर मार्ग निघण्याचा आशावाद | The Focus India

    भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिकायला यावे; स्वागतच आहे ; महामारीतून लवकर मार्ग निघण्याचा आशावाद

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी जरूर यावे. त्यांचे स्वागतच आहे, असे प्रतिपादन ट्रम्प प्रशासनातील अधिकारी एलिस वेल्स यांनी केले. भारतीय विद्यार्थी आणि दूतावासातील अधिकाऱ्यांशी त्या व्हर्च्युअल संवाद साधत होत्या. अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा यात सहभागी झाले होते.

    महामारीच्या काळात परदेशांत असलेल्या भारतीयांचा ओढा मायदेशाकडे असताना अमेरिकन प्रशासनातील महत्त्वाची जबाबदारी संभाळणाऱ्या अधिकाऱ्याने व्यक्क केलेली सकारात्मकता महत्त्वाची मानली जात आहे. एलिस वेल्स परराष्ट्र खात्याच्या उपमंत्री होत्या. दक्षिण आशिया विभागाची सूत्रे त्यांनी संभाळली आहेत.

    कोविड १९ महामारी लवकर संपेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कोणतेही विद्यार्थी आपल्या देशाचे सकारात्मक प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध दृढ होतात, असे सांगून त्या म्हणाल्या, “सध्या महामारीचा प्रकोप असल्याने व्हिसावर बंधने आहेत. पण ही बंधने कायम राहणारी नाहीत. लवकरच स्थिती सामान्य झाली की भारतीय विद्यार्थ्यांनाही व्हिसा जारी करण्यात येतील. भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी जरूर यावे. त्यांचे स्वागतच आहे.”

    सुमारे २ लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेत विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. चीन खालोखाल ही संख्या आहे. महामारीच्या काळात या विद्यार्थी वर्गाची ट्रम्प प्रशासन मदत करत आहे, अशी ग्वाही देखील एलिस वेल्स यांनी दिली.

    Related posts

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??

    राष्ट्रपतींच्या नियुक्तीने उज्ज्वल निकम, सदानंद मास्टर, मीनाक्षी जैन, हर्ष शांग्रीला राज्यसभेवर