• Download App
    पंतप्रधान करणार 'मन की बात' आठवड्यात दुसऱ्यांदा | The Focus India

    पंतप्रधान करणार ‘मन की बात’ आठवड्यात दुसऱ्यांदा

    • आज संध्याकाळी आठ वाजता
    •  देशवासियांमध्ये उत्सुकता आणि चिंताही 

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी (मंगळवार, ता. 24) देशाला संबोधित करणार आहेत. कोविड-19 या विषाणूचा प्रकोप झाल्यानंतर काही दिवसांपुर्वीच त्यांनी देशवासियांशी संवाद साधला होता. त्यास आठवडाही झालेला नाही. त्या आधीच दुसऱ्यांदा ते देशवासियांशी संवाद साधणार असल्याने त्याबद्दल उत्सुकता आणि चिंताही आहे.
    कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत देशातल्या नऊ जणांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या पाचशेच्या घरात पोहोचली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने महामारी या शब्दात वर्णन केलेल्या या विषाणूची लागण जगात आतापर्यंत तब्बल 73 लाख 77 हजार चारशे लोकांना झाली असून साडे सोळा हजारपेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू झाला आहे. मोदी यांनी ट्वीट करुन म्हटले आहे, की “कोरोना विषाणूच्या जागतिक उद्रेकासंबंधी मी देशवासियांना काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. आज, 24 मार्चला रात्री 8 वाजता मी देशाला संबोधित करेन.”

    Related posts

    भाजप मधल्या टॅलेंटची सुप्रिया सुळेंना “चिंता”; पण खुद्द त्यांच्या टॅलेंटचा त्यांच्याच पक्षाला का उपयोग होईना??

    शरद पवारांच्या घरातल्याच दोघांची परस्पर विरोधी वक्तव्ये; जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीतल्या गोंधळात भर!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून पुणे + पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजपशीच लढायची अजितदादांवर वेळ??