• Download App
    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा | The Focus India

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    • आपण छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवारांना खासदार संभाजी राजे यांनी “सारथी” शुभेच्छा दिल्या आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. सारथी संस्थेमार्फत राबविला जाणार तारा दूत प्रकल्प बंद पडला आहे. sambhaji raje pitches for saarathi organization शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे, अशा शब्दांमध्ये संभाजीराजे यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

    तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी पुण्यातील सारथी कार्यालय बाहेर मागील सहा दिवसांपासून सेवक बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत बोलताना अनेक विषयावर भूमिका देखील त्यांनी मांडली. sambhaji raje pitches for saarathi organization

    यावेळी संभाजीराजे म्हणाले की, “सारथी संस्थेच्या माध्यमातून तारादूत प्रकल्प राबविला जात होता. मात्र आता तोच प्रकल्प मागील कित्येक महिन्यापासून बंद असल्याने, त्या प्रकल्प अंतर्गत काम करणार्‍या सेवकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या मागणीसाठी सहा दिवसापासून सेवक सारथी संस्थेबाहेर ठिय्या आंदोलन करीत आहेत. मात्र याकडे या महाविकास आघाडी सरकारचे लक्ष नाही किंवा दखल देखील घेतली जात नाही.



    ही निषेधार्थ बाब असून या प्रश्न मी लवकरच शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. पण आज शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देत असून ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने ही संस्था सुरू केली आहे. त्याकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे शरद पवार साहेब आपण छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक असाल, तर ही सारथी संस्था जिवंत ठेवण्याची तुमची जबाबदारी आहे” अशी भूमिका त्यांनी मांडली.

    sambhaji raje pitches for saarathi organization

    ते पुढे म्हणाले की, सारथी संस्थेला स्वायत्तता देणार असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या विभागाने सारथी संस्थेला स्वायत्तता प्रदान देखील केली. मात्र सारथीचे अधिकारी कलम 25 च्या माध्यमातून आम्हाला स्वायत्तता असल्याचे सांगत आहेत. मग कसली स्वायत्तता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या आंदोलनकर्त्यांसाठी रस्त्यावर पुन्हा उभे राहावे लागेल असा इशारा देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारला त्यांनी दिला.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का

    यूपीए चेअरमनपदाच्या बातमीवर पवारांनी पडदा का पाडला असावा??