• Download App
    हिंदू स्वयंसेवक संघाचे अमेरिकेत मोठे मदतकार्य | The Focus India

    हिंदू स्वयंसेवक संघाचे अमेरिकेत मोठे मदतकार्य

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : अमेरिकेत चीनी व्हायरस कोरोनाने सर्वाधिक धुमाकूळ घातलेला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आंतरराष्ट्रीय शाखा हिंदू स्वयंसेवक संघाचे मोठे मदतकार्य तेथे उभे राहिले आहे.

    सेवा इंटरनँशनलच्या छत्राखाली हे मदतकार्य सुरू आहे. अमेरिकेतील २०० छोट्या – मोठ्या संस्था, संघटना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत.

    अमेरिकेतील २१ राज्यांमधील २५०० अधिक स्वयंसेवकांनी एकत्र येऊन मदतकार्य करण्यासाठी ५ लाख डॉलरचा निधी उभारला आहे. कोरोनाग्रस्तांवरील उपचारांसाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांची टीमही हिंदू स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्यरत आहे.

    भारतातून तसेच अन्य देशांमधून अमेरिकेत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना, नोकरदारांना फुड पँकेट्सपासून ते राहण्या खाण्याच्या सोयींपर्यंतच्या सुविधा पुरविण्यासाठी हिंदू स्वयंसेवक संघाचे प्रयत्न यशस्वी होत आहेत, अशी माहिती संघाचे समन्वयक विकास देशपांडे यांनी दिली.

    अमेरिकेत लॉकडाऊनमुळे बहुसंख्य विद्यार्थी, तरूणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना बेरोजगारी भत्ता, वैद्यकीय मदत मिळवून देण्यातही हिंदू स्वयंसेवक संघ आघाडीवर आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी हिंदू धार्मिक संस्था स्वामी नारायण मंदिराचे स्वामी चैतन्यमूर्तीदास यांनी देखील हिंदू स्वयंसेवक संघाच्या मदतकार्याची प्रशंसा केली आहे.

    वैद्यकीय क्षेत्रात भारतीय वंशाचे ५० हून अधिक डॉक्टर या मदतकार्यात जोडले गेले आहेत. सेवा इंटरनँशनलने प्लाझ्मा ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. ६० प्लाझ्मा दात्यांनी त्यावर नोंदणी केली आहे.

    साडेतीन कोटी डॉलरचा निधी मदतकार्य करण्यासाठी उभारण्याचे ध्येय सेवा इंटरनँशनलने ठेवले आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्त न्यूयॉर्कमध्ये दररोज २५ हजार फूड पँकेट्स देत आहे.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का