• Download App
    शेतकरी, बारा बलुतेदार, असंघटित कामगारांसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज द्या | The Focus India

    शेतकरी, बारा बलुतेदार, असंघटित कामगारांसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज द्या

    • महाआघाडी सरकारविरोधात भाजप आक्रमक; महाराष्ट्र बचाव आंदोलन

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : महाराष्ट्रातले शेतकरी, बारा बलुतेदार, असंघटित कामगार कोरोनाच्या संकटामुळे कोलमडून गेले आहेत. तरीही ते संकटाशी धैर्याने मुकाबला करत आहेत. या वर्गासाठी राज्य सरकारने ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज तातडीने द्यावे, अशी मागणी प्रदेश भाजपने आज केली.

    भाजपने राज्य सरकारच्या अपयशाविरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. त्यावेळी ही प्रमुख मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे हे नेते प्रदेश कार्यालयातून या आंदोलनात सहभागी झाले होते. अन्य नेते विविध ठिकाणांहून आंदोलनात सहभागी झाले होते.

    महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू!
    आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडलेली आणि शासनाची निष्क्रियता, हे किती दिवस सहन करायचे, असा सवाल फडणवीस यांनी केला. भाजपने राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली पण सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यात अपयशी ठरले आहे. हे आम्ही जनतेसमोर आणतोय, असे त्यांनी सांगितले.

    जनता सहन तरी किती करणार?
    आज मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आंदोलनात सहभाग घेतला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत, कायदा-सुव्यवस्थेवर कुठलाही ताण न आणता, आपल्या घराच्या अंगणात भाजपा कार्यकर्ते आज राज्यभर जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधत आहेत. हे आंदोलन लाखो कार्यकर्त्यांनी यशस्वी केले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

    ते म्हणाले, “राज्यात शेतमाल खरेदी थांबली आहे. शेतमाल घरातच पडून आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना त्याची अवस्था वाईट आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. हातावर ज्यांचे पोट आहे, अशांना तत्काळ पॅकेज देण्याची गरज आहे.

    • केंद्र सरकारने २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले. देशातील छोट्या-छोट्या राज्यांनी सुद्धा पॅकेज जाहीर करण्यात पुढाकार घेतला. अशात महाराष्ट्रासारखे मोठे राज्य एकाही घटकासाठी एकही पॅकेज जाहीर करू शकत नाही, ही बाब वेदनादायी आहे.
    • ना कोणत्या घटकाला मदत, ना कोरोनाग्रस्त रूग्णांची काळजी.
      मृतदेहांशेजारी उपचार, एका खाटेवर दोन रूग्ण! कोविड योद्ध्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी नाही. कोरोनाव्यतिरिक्त अन्य रूग्णांवरील उपचारांची स्थिती सुद्धा अतिशय वाईट आहे.
    • महाराष्ट्रात पोलिस प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना त्यातील सुमारे १४०० पोलिसांना लागण, त्यांच्याही उपचारांची राज्य सरकारला काळजी नाही.
    • केवळ रूग्णवाहिका नाही, म्हणून अनेकांचे मृत्यू होत आहेत. भाजपाचे हे आंदोलन सरकारला जागे करण्यासाठी केले आहे. रूग्णसंख्या ४० हजारांवर गेली असताना आरोग्यसेवेकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का